विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली– दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि तमिळनाडू या राज्यांनी आता लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या लशींची मागणी वाढली आहे. Eight states will take vaccines from world tender process
परंतु सध्या केंद्र सरकारकडून लस पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याची अनेक राज्य सरकारांची तक्रार आहे. त्यामुळे या राज्यानी हा निर्णय घेतला आहे.
कर्नाटक या माध्यमातून दोन कोटी डोसची खरेदी करणार आहे. येत्या सात दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या आहेत.
ओडिशा, तेलंगण आणि तमिळनाडू सरकारने देखील जागतिक स्तरावरून लस खरेदी करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. आंध्र प्रदेश सरकारही येत्या दोन-तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
दिल्ली सरकारनेही लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्याची तयारी केली आहे. याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला जबाबदार ठरविले आहे. लसीचा तुटवडा राज्यांना भासत असताना केंद्रातील भाजप सरकार हे राज्य सरकारांना जागतिक निविदा काढून लस खरेदी करण्यास भाग पाडत आहे, अशी टीका सिसोदिया यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App