वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूमधील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत चेन्नईतील चेट्टीनाड ग्रुपशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यापूर्वी डिसेंबर 2020 मध्ये, प्राप्तिकर विभागाने या कंपनीच्या तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात सुमारे 60 परिसरांवर कारवाई केली होती. त्यावेळी 700 कोटींहून अधिक रुपयांची करचोरी झाल्याचा दावा करण्यात आला होता. ED raids Chettinad Group, 700 crore tax evasion caught by IT 2 years ago
शोध मोहिमेदरम्यान 23 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड सापडल्याचे आयटी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी निवेदन जारी केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 100 वर्षे जुन्या या ग्रुपचा सिमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, कन्स्ट्रक्शन यासह अनेक क्षेत्रांत व्यवसाय आहे.
110 कोटी रुपयांची विदेशी मालमत्ताही सापडली
निवेदनात दावा करण्यात आला आहे की, छाप्यांदरम्यान अधिकाऱ्यांनी मुदत ठेवींच्या रूपात 110 कोटी रुपयांच्या विदेशी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही उघडकीस आणली आहेत. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ब्लॅक मनी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
रिअल इस्टेट कंपनी जी स्क्वेअरवर आयकर छापा
दुसरीकडे, तामिळनाडूमध्ये, आयकर विभाग (IT) सोमवारी सकाळपासून रिअल इस्टेट खासगी कंपनी जी स्क्वेअरच्या अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवत आहे. चेन्नईशिवाय कोईम्बतूर आणि त्रिची येथे छापे टाकले जात आहेत. कंपनीच्या 50 हून अधिक ठिकाणी शोध घेण्यात येत आहे.
डीएमकेचे आमदार एमके मोहन यांच्या मुलाच्या घरीही आयटी अधिकारी पोहोचले. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. वास्तविक, द्रमुक आमदाराच्या मुलाकडे जी स्क्वेअर कंपनीचे शेअर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App