विशेष प्रतिनिधी
बंगळूर – सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसचे आमदार बी. झेड. जमीर अहमद खान आणि माजी मंत्री आर. रोशन बेग यांच्या निवासस्थानावर चार हजार कोटीच्या ‘आयएमए’ गैरव्यवहारासंदर्भात छापे घातले.ED raides on house of cong. mla
‘आयएमए’चे संस्थापक महम्मद मन्सूर खान यांच्यात काही व्यवहार झाल्याचा संशय आहे. त्यासाठी सीबीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये बेग यांना अटक केली होती आणि सध्या ते जामीनावर आहेत. सीबीआयने एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
‘ईडी’च्या बंगळूर विभागाने २०१९ मध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू केली. प्रकरणाच्या संवेदनशील आणि हाय प्रोफाइल स्वरूपामुळे २०२० मध्ये हे प्रकरण दिल्लीतील मुख्य कार्यालयात हस्तांतर केले होते, असे सूत्रांनी सांगितले.
सुमारे दीड वर्ष या प्रकरणी गुप्तता राखली होती. नवी दिल्लीतील ‘ईडी’च्या १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या एक पथकाने बंगळूरमध्ये बेग यांच्याशी निगडित सहा मालमत्तांवर छापे घातले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App