नवी कौशल्ये शिका, अन्यथा 2025 पर्यंत 10 पैकी 6 जणांची जाईल नोकरी, World Economic Forum चा अहवाल

World Economic Forum Report Show that 6 out of 10 people will lose their jobs by 2025

World Economic Forum : कोरोना महामारीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अजूनही नोकऱ्यांवर संकट आहेच. आता आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum)च्या अहवालानुसार, सन 2025 पर्यंत दर 10 पैकी 6 जणांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. याचे कारण म्हणजे यंत्रांच्या तुलनेत माणसाला कामासाठी लागणारा वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. World Economic Forum Report Show that 6 out of 10 people will lose their jobs by 2025


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. अजूनही नोकऱ्यांवर संकट आहेच. आता आणखी एक धक्कादायक अहवाल समोर आलाय. वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (World Economic Forum)च्या अहवालानुसार, सन 2025 पर्यंत दर 10 पैकी 6 जणांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. याचे कारण म्हणजे यंत्रांच्या तुलनेत माणसाला कामासाठी लागणारा वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु याच अहवालात नव्या प्रकारच्या 9.7 कोटी रोजगारांची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

अहवालानुसार, कोरोनाच्या आधी आणि कोरोनादरम्यान यंत्रांच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे बहुतांश लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. 19 देशांमध्ये काम करणाऱ्या प्राइस वाटर हाऊस कूपर कंपनीत काम करणाऱ्या 32,000 कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणानंतर ही बाब समोर आली आहे.

काय आहे अहवालात?

या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या जगभरातील 40 टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटतेय की, आगामी 5 वर्षांत त्यांना आपली नोकरी गमवावी लागू शकते. तर 56 टक्के लोकांना वाटते की, भविष्यातही दीर्घकाळपर्यंत त्यांना रोजगाराचे विविध पर्याय मिळत राहतील. 60 टक्क्यांहून जास्त लोकांनी सरकारने नोकरी सुरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. जगभरातील लॉकडाउनमध्ये 40 टक्के लोकांनी आपली डिजिटल कौशल्य वृद्धिंगत केली आहेत. तर 77 टक्के लोक काहीतरी नवे शिकण्यासाठी आणि स्वत:त सुधारणेसाठी तयार आहेत.

रिपोर्टनुसार, 80 टक्क्यांहून जास्त नव्या टेक्निकनुसार आपल्या क्षमता वाढवत आहेत. नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी ते उत्साही आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मागच्या एका अहवालानुसार यंत्रे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अवलंबित्व वाढल्याने 85 दशलक्ष नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच अहवालानुसार, 9.7 कोटी नव्या प्रकारच्या रोजगारांची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकूणच, तुम्ही नवी कौशल्ये शिकत राहिलात तर तुम्हाला रोजगाराच्या नव्या संधी मिळत राहतील, अन्यथा तुमच्या बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळेल, असेच या अहवालानुसार दिसून येते.

World Economic Forum Report Show that 6 out of 10 people will lose their jobs by 2025

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात