मनी मॅटर्स : पिकनिकला जाण्यासाठीच्या पैशांचे नियोजन आधीच करा, फिरण्यासाठी पैसा असा जमवा…

संकल्प करणे आणि त्यांचे पालन करणे हे देखील आपल्या हातात असते. तुम्ही भरपूर फिरण्याचा संकल्प केला असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या नियोजनासंदर्भात काही खास टिप्स माहिती पाहिजेत. तुम्ही पिकनिकसाठी पैसा जमवण्याचा विचार करत असाल तर पैशांचे नियोजन कशा पद्धतीने करायला हवे ते आज आपण जाणून घेऊया. जेणेकरुन तुम्हाला काही गोष्टींचा श्री गणेशा करता येईल आणि फिरण्याचा तुमचा संकल्प पूर्ण करता येईल. पैशांचे नियोजन करताना तुम्हाला आधीच्या काही जमाखर्चाचा हिशोब लावणे गरजेचे असते. Money Matters: Plan your money for a picnic in advance, save money for a trip

पगार सुरु झाल्यानंतर भविष्याची तरतूद म्हणून आपण अनेकदा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवतो. त्याचे हप्ते आपल्याला पुन्हा एकदा जाणून घेणे गरजेचे असते. कारण त्यानंतरच तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पिकनिक करता येतील हे कळू शकते. त्यामुळे सगळ्यात आधी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सगळी बचत केल्यानंतर तुमच्या हातात अजून किती रक्कम शिल्लक राहते. याचा हिशोब मांडून घ्या.

तुमचे फिरायचे प्लॅनिंग आहे म्हणजे तुम्हाला तडकाफडकी पटकन उठून जाता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशांची तरतूद स्वत:च करावी लागेल. त्यामुळे तुमच्या इच्छित स्थळी जाण्याचा खर्च किती आहे याचा अंदाज घ्या. त्यानुसार महिन्याला ठराविक रक्क्म बाजूला काढायला सुरुवात करा. ठिकाण निवडतानाच तुम्ही असे ठिकाण निवडा.

जे तुमच्या पगारामध्ये आणि बजेटमध्ये बसणारे असेल. उदा. तुमचा पगार तीस हजार आहे. तुमचा महिन्याचा खर्च दहा हजार आणि तुमची बचत दहा हजारांची असेल. तर उरलेल्या पैशातून तुम्ही हवी असलेली रक्कम बाजूला काढू शकता. तुम्ही दोन हजार इतकी रक्कम काढली तरी तुम्हाला सहा महिन्यांनी बारा हजार रुपये मिळतील. शिवाय ही रक्कम दरमहा बॅंकेत ठेवली तर त्यावर व्याजही मिळते. या बजेटमध्ये तुम्ही तुमचे पिकनिक काढा. यामुळे फिरण्यासाठी एकदम ताणही येणार नाही.

Money Matters: Plan your money for a picnic in advance, save money for a trip