लाईफ स्किल्स  : बोलताना हावभावाचा पडतो मोठा प्रभाव, इतरांवर छाप पाडण्यासाठी हावभावावर सतत द्या लक्ष…


आपले व्यक्तीमत्व कसे ठेवता यावर अनेक बाबी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही बोलताना कसे बोलता हे फार महत्त्वाचे आहे. काही लोकांच्या तोंडावर बोलताना काहीच हावभाव नसतात. मात्र बोलताना जर तुम्ही फक्त हसून बोलला तर तुमचं बोलणं इतरांपर्यंत लगेच पोहचू शकते. हसून बोलणाऱ्या लोकांशी इतर लोक लवकर जोडले जातात. बोलताना तुमच्या हावभावाचा फार प्रभाव इतरांवर पडत असतो. म्हणूनच इतरांवर आपली छाप पाडण्याचा हा एक सर्वात महत्त्वाचा गुण आहे हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे इतरांशी नम्रपणे आणि काळजीपूर्वक बोला. Life Skills: Gestures have a big impact when speaking, pay constant attention to gestures to impress others …

इतरांशी जोडले जाण्याचा संवाद हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. बोलण्यातून तुमचे व्यक्तिमत्व इतरांना समजत असते. तुम्ही जसे असता तसेच तुम्ही बोलत असता. म्हणूनच जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक आणि नम्रपणे इतरांशी बोलता तेव्हा तुमच्याबद्दल चांगल्या भावना इतरांच्या मनात निर्माण होत असतात.

नम्रपणे बोलणे हा इतरांशी मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. वाचन, श्रवण आणि मार्गदर्शन हे व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचे टप्पे आहेत. यासाठीच चांगली पुस्तके वाचा ज्यामुळे तुमच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडेल. जगाला सामोरं जाताना हेच ज्ञान तुमच्या उपयोगी पडू शकतं. यासाठी चांगली प्रभावी आणि सकारात्मक विचारांची पुस्तके वाचा. दररोज कितीही बिझी असला तरी रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं वाचन करण्याची स्वतःला सवय लावा. त्याचप्रमाणे तुमचा पेहराव हा तुमच्या व्यक्तीमत्वाचा एक भाग असतो.

यासाठीच नेहमी चांगला पेहराव करा. नीटनेटक्या आणि स्वच्छ पेहरावामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते. कारण तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सर्वात आधी लोकांच्या नजरेत येतात ते तुमचे कपडे आणि पेहराव केलेल्या इतर गोष्टी. यासाठी टापटिप आणि आकर्षक राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी फार महागडे अथवा ब्रॅंडेड कपडे, शूज,बॅग्ज वापराव्यात असं मुळीच नाही. मात्र तुमचे कपडे नीटनेटके, स्वच्छ आणि व्यवस्थित असतील याची नक्कीच काळजी घ्या. विशेषतः ऑफिस इंटरव्यूव्ह, ऑफिस पार्टीज अशा ठिकाणी ड्रेसकोडप्रमाणेच पेहराव करा.

Life Skills: Gestures have a big impact when speaking, pay constant attention to gestures to impress others …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात