मनी मॅटर्स  : नफा कमावणे हाच प्रत्येक व्यवसायाचा धर्म आहे, हे ध्यानात ठेवा


श्रीमंती म्हणजे पैसा! श्रीमंत होण्यासाठी अनेक बाबी करता येतात. करियर तुमच्या आवडीचं असेल तर तुम्ही मन लावून त्या क्षेत्रात काम करता. आणि अशा करिअरचे अंतिम रुप म्हणजे, त्या क्षेत्रात तुम्ही इतरांच्या तुलनेने अधिक श्रीमंत असता. अनेक तज्ञांनी करिअर कसे निवडावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. जे काम करताना तुम्हाला तहानभूकीचं भान रहात नाही, ते तुमचं करिअर. वडिलोपार्जित श्रीमंती असणाऱ्यांना बसूनच खायचं असतं असं काही नाही. मुकेश अंबानी यांनासुद्धा त्यांचे श्रीमंतांच्या यादीतील स्थान कायम ठेवण्यासाठी प्रचंड व अविरत कष्ट घ्यावे लागतात. केवळ नशिबाने मिळाले म्हणजे सारे काही झाले असे होत नाही. अंबानींचेच उदाहरण घ्यायचे झाले तर मुकेश व अनिल अंबानी यांना समसमान संपत्ती मिळाली होती. पण अनिल अंबानी कर्जबाजारी झाले. यावरुनच वडिलोपार्जित श्रीमंती टिकवण्यासाठी मेहनत करावीच लागते, हे ध्यानात येते. Money Matters: Making a profit is the religion of every business, keep in mind

कोणताही व्यवसाय सुरु करताना आणि वृद्धिंगत करताना संधीचा लाभ घेतला पाहिजे. पैसे येऊ लागले की काही नवश्रीमंतांना तर्काचा फारच पुळका येतो. मला कही जास्त पैसा नको! माझी भूक तर दोन वेळच्या जेवणाची आहे! वगैरे वगैरे. श्रीमंत होणाऱ्याला नोटा मोजण्याचा आणि त्यात वृद्धी करण्याचा ध्यास लागला पाहिजे. श्रीमंतीत वृद्धी होते ती नफा कमवल्याने. नफा कमावणे हाच प्रत्येक व्यवसायाचा धर्म आहे, हे ध्यानात ठेवा. जशी संधी मिळेल तेव्हा नफा कमवा. प्रत्येक व्यवसाय हा दुसऱ्याच्या गैरसोयीमुळे निर्माण होतो.

सोसायटीत वीज गेली. वीज दुरुस्तीचं काम माझ्याशिवाय कोणीच करु शकत नाही. ईथे माझा इलेक्ट्रिशियन म्हणून व्यवसाय निर्माण होतो. काही न्यायालयीन काम निघालं आणि माझ्या शिवाय कायद्याचं ज्ञान कोणालाच नाही. ईथे माझा वकील म्हणून व्यवसाय निर्माण होतो. दुसऱ्याची अडचण तीच व्यवसायाची नांदी होय. अशा तऱ्हेने सुरु झालेल्या व्यवसायात प्रगतीचा ध्यास आणि ध्येय पूर्तीसाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी हे तर तथ्य आहेच. पण नफा मिळवण्याची संधी सुद्धा शोधत राहिलं पाहिजे. अशा तऱ्हेने सुद्धा श्रीमंत होता येतं.

Money Matters: Making a profit is the religion of every business, keep in mind

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात