India Forex Reserves : परकीय गंगाजळीत नव्या विक्रमाची नोंद, 1.88 अब्ज डॉलर्सने वाढून 611.89 अब्ज डॉलरवर

India forex reserves new record touched 612 billion dollars

India Forex Reserves : देशातील परकीय चलन साठा 1 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात 1.883 अब्ज डॉलरने वाढून विक्रमी 611.895 अब्ज डॉलरवर पोहोचला. शुक्रवारी जाहीर झालेल्या आरबीआयच्या आकडेवारीनुसार 2 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 9 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता (एफसीए) आहे. India forex reserves new record touched 612 billion dollars


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील परकीय चलन साठा 1 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात 1.883 अब्ज डॉलरने वाढून विक्रमी 611.895 अब्ज डॉलरवर पोहोचला. शुक्रवारी जाहीर झालेल्या आरबीआयच्या आकडेवारीनुसार 2 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठा 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 9 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात चलन साठ्यात वाढ होण्याचे कारण म्हणजे परकीय चलन मालमत्ता (एफसीए) आहे.

आरबीआयच्या एकूण चलन साठ्यात त्याचा मोठा वाटा आहे. एफसीए 1.297 अब्ज डॉलरने वाढून 568.285 अब्ज डॉलरवर गेला. आठवड्यात सोन्याच्या साठा 58.4 दशलक्ष डॉलर्सने वाढून 36.956 अब्ज डॉलरवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये जमा केलेले विशेष रेखांकन अधिकार (एसडीआर) 1.547 अब्ज डॉलर्सवर कायम आहेत. आयएमएफकडे भारताची राखीव स्थिती 3 दशलक्ष डॉलर्सने वाढून 5.107 अब्ज डॉलर झाली आहे.

अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी आणि आयातीसाठी आवश्यक

अर्थतज्ज्ञांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परकीय चलन साठा अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या आकस्मिक निधीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये सतत पैसा आणि एफडीआय जमा करत असते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे आवश्यक आहे. जर आरबीआयकडे पुरेसा साठा असेल, तर क्रेडिट रेटिंगवर सकारात्मक परिणाम होईल आणि यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही बळकट होईल. भारतीय अर्थव्यवस्था सध्या खुल्या हातांनी गुंतवणूकदारांचे स्वागत करत आहे.

15 महिन्यांच्या आयातीसाठी भारत सज्ज

सध्या भारत 15 महिन्यांपर्यंत आयात करण्यास सक्षम आहे. जपानमध्ये 22 महिन्यांचा साठा आहे. चीन, जपान, स्वित्झर्लंड आणि रशियानंतर भारताकडे सर्वाधिक परकीय चलन साठा आहे. स्वित्झर्लंडमध्ये 39 महिन्यांपर्यंत आयात करण्याची क्षमता आहे. आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेव्हा देशाची अर्थव्यवस्था कोरोना संकटाच्या बाहेर येईल तेव्हा आयात वाढेल आणि त्या काळासाठी हा निधी खूप महत्त्वाचा आहे.

India forex reserves new record touched 612 billion dollars

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण