सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, केंद्राकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे

FM Sitharaman Takes Back decision of reducing interest rates on small savings schemes

FM Sitharaman : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रात्री उशिरा असे वृत्त आले होते की, आर्थिक वर्ष 2020-21च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, हा आदेश चुकून निघाला होता. FM Sitharaman Takes Back decision of reducing interest rates on small savings schemes


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रात्री उशिरा असे वृत्त आले होते की, आर्थिक वर्ष 2020-21च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे. पण आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, हा आदेश चुकून निघाला होता.

मार्च 2021चे दर लागू राहतील- अर्थमंत्री

आपल्या ट्विटमध्ये अर्थमंत्री म्हणाल्या की, “भारत सरकारच्या छोट्या बचत योजनांचे व्याजदर पूर्वीप्रमाणेच राहतील. 2020-2021च्या अखेरच्या तिमाहीत जे दर होते, म्हणजेच मार्च 2021चेच दर लागू राहतील.”

व्याजदरात 1.1% झाली होती कपात

बुधवारी सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि एनएससी (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र) यासह छोट्या बचत योजनांवर व्याजदरात 1.1 टक्के कपात केली होती. 1 एप्रिलपासून 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत कपातीची घोषणा केली गेली. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पीपीएफवरील व्याज ०.7 टक्क्यांनी कमी करून 6.4 टक्के करण्यात आले, तर एनएससीवर ते 0.9 टक्क्यांनी कमी करून 5.9 टक्क्यांवर नेण्याची घोषणा करण्यात आली होती.

ज्येष्ठ नागरिक पंचवार्षिक बचत योजनेवरील व्याजदर 0.9 टक्क्यांनी कमी करून 5.5 टक्के करण्यात आले. या योजनेंतर्गत व्याज तिमाही आधारावर दिले जाते. पहिल्यांदा बचत खात्यात जमा झालेल्या रकमेवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 3.5 टक्क्यांवर आणण्यात आले होते.

व्याजावर सर्वाधिक 1.1 टक्के कपात एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.5 टक्क्यांनी कमी करून 5 टक्के, तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.4 टक्क्यांनी कमी करण्यात आले होते. पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज 0.9 टक्के कमी करून ते 5.8 टक्के करण्यात आले होते. परंतु अर्थमंत्र्यांनी हा आदेश मागे घेऊन सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे.

FM Sitharaman Takes Back decision of reducing interest rates on small savings schemes

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात