शेअर वाढल्याशिवाय विकायचा नाही


सध्या व्याजदरकपातीच्या धोरणामुळे सर्व बॅंकांनी आणि टपाल (पोस्ट) खात्याने आपल्या योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे आणि ती यापुढेही चालू राहणार आहे. मात्र, दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे. अशा वेळेस बॅंकेच्या किंवा पोस्टाच्या योजनांच्या व्याजावर अवलंबून असलेल्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होण्याची शक्यचता आहे. कारण मिळणारे व्याज कमी-कमी होणार आणि खर्च मात्र वाढत राहणार. अशा वेळेला त्यांच्यापुढे दोनच मार्ग उरणार आहेत. Do not sell without increasing the stock

एकतर खर्च कमी करणे किंवा कमी झालेल्या व्याजाची भरपाई करण्यासाठी अजून जास्त गुंतवणूक करणे. खर्च कमी करणे सर्वांनाच जमेल, असे नाही. मात्र, कमी होणाऱ्या व्याजाची भरपाई परत बॅंकेत किंवा पोस्टाच्या योजनांत कमी दराने जास्त गुंतवणूक करण्यापेक्षा जास्त व्याज किंवा परतावा देणाऱ्या काही संधी आहेत का, हे पाहावे लागेल. यासाठी आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत थोडाफार बदल करावा लागेल. हा बदल म्हणजे फारशी जोखीम न पत्करता कमी व्याजातच नवीन गुंतवणूक करणे किंवा थोडी जोखीम पत्करून जास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत गुंतवणूक करणे हा होय.

बऱ्याच गुंतवणूकदारांचे लक्ष शेअर्स किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे गेलेले नसते. शेअर्स म्हणजे सट्टा आणि आपले पैसे बुडणार, अशा गैरसमजुतीतून ते आपली संधी घालवत असतात. शेअर्समध्ये अनेक प्रकाराने व्यवहार करता येतात. सट्ट्याचे व्यवहार करून बरेच पैसे मिळविता येतात किंवा जातातसुद्धा. पण दुसऱ्या प्रकारचा व्यवहार म्हणजे घेतलेला शेअर वाढल्याशिवाय विकायचा नाही. शेअर बाजार महिन्यातून 7-8 वेळेला बराच वर जातो किंवा 7-8 वेळा बराच खाली येतो. मधल्या वेळेला तो स्थिर असतो. अशावेळी थोडा अभ्यास करून काही शेअर्स निवडता येऊ शकतात. असे शेअर आपल्याला बॅंक किंवा पोस्टाच्या योजनांच्या व्याजदरापेक्षा जास्त परतावा देऊ शकतात. हा परतावा म्हणजे घेतलेल्या शेअर्सचा भाव आणि विकलेल्या शेअर्सच्या भावातील फरक असतो. याशिवाय त्या कंपनीने लाभांश किंवा बोनस भाग जाहीर केला असेल आणि जाहीर केलेल्या दिवशी असे शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात असतील तर तो जादा परतावा म्हणून गृहित धरता येईल.

Do not sell without increasing the stock

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात