विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वtर – जैवविविधतेशी संबंधित पर्यटनाच्या इको- टुरिझम माध्यमातून ओडिशाचा चेहरामोहरा बदलू लागला आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळतोच आहे पण त्याचबरोबर राज्यातील विकास प्रकल्पांच्या उभारणीलाही वेग आला आहे.Eco tourism increased in Odisha
इको टुरिझममुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ९६ टक्क्यांची वाढ झाली असून महसुलामध्येही ४९ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदविली गेली आहे. मागील दोन वर्षांमध्ये हे बदल झाल्याचे दिसून येतात. या पर्यटनाचा मोठा लाभ ग्रामीण भागातील जनतेला झाला आहे. निसर्ग आणि जंगलांचे संवर्धन याला शाश्वनत विकासामध्ये मोठे स्थान आहे. राज्य सरकारने नेमकी हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळींवर उपाययोजनांची आखणी केली.
बारगड जिल्ह्यातील नृसिंहनाथ, कोरपूट येथील पाईन फॉरेस्ट, नौपाडातील पाटोरा डॅम, सुंदरगडमधील तेनसा आणि केओंझार कांजीपानी ही ठिकाणे नवी इको टुरिस्ट स्पॉट बनणार आहेत. ही ठिकाणे एक तर पर्यनटस्थळे बनतील किंवा त्यांचे स्वरूप हे नाईट स्टे कॅम्पसारखे असेल. कलिंगाघाट पाईन फॉरेस्ट, बोनाई, देवमाली हिलटॉप, डमरूगढ महानदी किनारा परिसर आणि कलहांडी जिल्ह्यातील जाखम या परिसराचा नाईट स्टे कॅम्प म्हणून विकास घडवून आणला जाणार आहे.
राज्यात २०१७ ते १८ या एका वर्षाचा विचार केला तर राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ११ हजार ५०० एवढी होती ती २०१८-१९ मध्ये २९ हजार ०२४ वर पोचली आणि २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ५७ हजारांवर गेल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App