आधी काँग्रेस कार्यकर्ते आता काँग्रेस नेत्यांसह विरोधी नेते प्रियांका गांधींसाठी एकवटले!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हिंसाचाराच्या घटनेवरून आज सकाळपासूनच लक्ष सीतापूरकडे वळले होते. त्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर होते. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना तेथे स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे. आता मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांपाठोपाठ काँग्रेसचे केंद्रीय नेते आणि विरोधकांपैकी महत्त्वाचे नेते प्रियांका गांधी यांच्यासाठी एक पडताना दिसत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून प्रियांका गांधी यांना स्थानाबद्धतेतून सोडण्याची मागणी केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे आरोप केले आहेत.Earlier, Congress workers now rallied with Congress leaders for opposition leader Priyanka Gandhi !!

त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रियांका गांधी यांची बाजू उचलून धरत प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिस ज्या पद्धतीने वर्तणूक देत आहेत, तशी वर्तणूक आणीबाणीत देखील कोणाला दिली नव्हती असे टीकास्त्र सोडले आहे.काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करून मोदी आणि योगी सरकारवर टीकेचे प्रहार केले आहेत, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे आपले राज्य सोडून उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत त्यांना राज्य सरकारने लखनऊ विमानतळावर बाहेर पडू दिले नाही. ते प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी सीतापूर येथे जाऊ इच्छित होते. प्रियांका गांधी यांनी सीतापूरच्या सरकारी डाक बंगल्यातून एक व्हिडिओ जारी केला आहे त्यामध्ये त्यांनी एका जीपने काही माणसांना उडवले तो व्यक्ती अजून मोकाट का?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे.

लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर आज प्रियांका गांधी आणि सीतापूर उत्तर प्रदेश मधल्या राजकारणाच्या केंद्रबिंदूवर आले आहेत. याचा नेमका अर्थ काय असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे.

Earlier, Congress workers now rallied with Congress leaders for opposition leader Priyanka Gandhi !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण