दिल्लीत ड्रोन तसेच हॉट एअर बलूनवरवर बंदी, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय़

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत शुक्रवारपासून ड्रोन आणि हॉट एअर बलूनवर बंदी घालण्यात आली. ३२ दिवसांसाठी म्हणजे १६ ऑगस्टपर्यंत ती लागू असेल. यानुसार हवेत साधने-वस्तू-वाहने उडविण्यावरही बंदी घालण्यात आली.Drone and hot air baloone baned in Delhi

दिल्लीचे पोलिस आयुक्त बालाजी श्रीवास्तव यांनी याबाबत आदेश जारी केला. काही समाजकंटक, गुन्हेगारी, दहशतवादी शक्ती अशा साधनांचा वार करून सामान्य जनता, महत्त्वाच्या व्यक्ती, संस्था यांना धोका पोचवू शकतात अशी माहिती मिळाली. त्यामुळे भारतीय दंडविधान कलम १८८ अन्वये हा आदेश काढण्यात आला.पॅराग्लायडर, युएव्ही (मानवरहित हवाई वाहन), युएएस (मानवरहित हवाईउड्डाण यंत्रणा), अत्यंत कमी वजनाची विमाने, रिमोटवर नियंत्रित केली जाणारी विमाने, छोट्या आकाराची विमाने, क्वाडकॉप्टर आदींचाही यात समावेश आहे. विमानातून पॅरा-जंपिंग करण्यावरही बंदी असेल.

Drone and hot air baloone baned in Delhi

महत्त्वाच्या बातम्या