आयुर्वेदाचे पितामह डॉ. पी. के. वारियर यांचे केरळमध्ये निधन


विशेष प्रतिनिधी

मलाप्पुरम – आयुर्वेदाचे पितामह आणि कोटक्कल आर्य वैद्यशाळेचे (केएएस) व्यवस्थापकीय विश्वेस्त डॉ. पी. के. वारियर (वय १००) यांचे निधन झाले. Dr. P. K. Warrier no more

५ जून१९२१ रोजी श्रीधरन नंबूदिरी आणि पन्नियमपिल्ली कुन्ही वारियर यांच्या घरी जन्मलेले पन्नियमपिल्ली कृष्णनकुट्टी वारियर यांचे शालेय शिक्षण कोट्टक्कल येथे झाले. वयाच्या विसाव्या वर्षी ते केएएसमध्ये दाखल झाले. शिक्षण सोडून ते भारत छोडो आंदोलनात सामील झाले. मात्र नंतर त्यांनी परत अभ्यास सुरू केला. वयाच्या २४ व्या वर्षी ते केएएसचे विश्वयस्त बनले.



आयुर्वेद क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. वारियर यांना १९९९ रोजी पद्मश्री आणि २०१० रोजी पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. उपचाराच्या रुपातून वारियर यांनी आयुर्वेद उपचाराला लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचा जन्मशताब्दी सोहळा ८ जून रोजी आयोजित केला होता. मलप्पुरमजवळील कोट्टक्कल येथे प्रसिद्ध आर्य वैद्यशाळा आणि आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्या पुढाकारातून अनेक सेवा सुरू करण्यात आल्या.

वारियर यांनी भारतातील नाही तर जगभरातील हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत आणि त्यात दुसऱ्या देशाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधानांचा देखील समावेश होता. त्यांना आयुर्वेदातील पितामह असेही म्हटले जात असत.

Dr. P. K. Warrier no more

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात