मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दृकश्राव्य माध्यमातातून शिवसेना नेते आणि मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (ता.४) चर्चा केली.”Don’t sit back and answer the personal charges against us, if …..” : Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : यावर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार या महापालिकांसह राज्यातील १५ महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.
यावेळी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ”आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका; तर शिवसेनेने महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोहोचवा,” असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दृकश्राव्य माध्यमातातून शिवसेना नेते आणि मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत मंगळवारी (ता.४) चर्चा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आमच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्यात वेळ घालवू नका.
ते काम आम्ही करू.शिवसेनेने महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवा,असे निर्देश ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच ठाकरे यांनी कोविड काळातील कामांचाही आवर्जून उल्लेख केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App