DIGITAL INDIA : मोदींचे स्वप्न सत्यात ! नंदीबैलाने स्वीकारले ‘फोन पे’ने पैसे ; डिजिटल इंडियाचा अजून काय पुरावा हवा? आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ


  • मोदींचे स्वप्न सत्यात उतरल्याचा हा पुरावाच आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मोदी सरकार येण्याआधी भारतात सगळे व्यवहार कॅशमध्ये व्हायचे आणि डिजिटल पेमेंट किंवा ऑनलाईन पेमेंट ही स्वप्नवत गोष्ट होती. भारतात ही गोष्ट सत्यात येण्यासाठी अजून काही दशके जातील असा अनेकांचा कयास होता.  पण मोदी है तो मुमकीन है म्हणतात ते उगाच नाही .त्यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले-दाखवले-आणि पूर्णही केले .Do you need any more evidence of the large-scale conversion to digital payments in India

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये, खासकरून कोरोनाच्या काळात या गोष्टी एवढ्या गतीने बदलल्या की अलिकडे कॅशमधले व्यवहार अगदी कमी झाले आहेत. यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक व्हिडीओ शेअर करत त्याचा पुरावा देखील दिला आहे. नंदीवाल्या बैलाला देण्यात येणारा पैसाही आता ‘फोन पे’च्या माध्यमातून दिला जातोय असं त्या व्हिडीओमध्ये दिसतंय.

भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे याला आणखी काही पुरावे हवेत का? असा प्रश्न विचारत आनंद महिंदा यांनी विचारत एक नंदीबैलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा नंदीबैलाच्या डोक्यावर फोन पे चे यूपीआय स्कॅनिंग कोड लावण्यात आलं असून त्याच्या माध्यमातून दक्षिणा स्वीकारण्यात येत आहे.

एक नंदीबैदवाला त्याच्या नंदीबैलाला घेऊन दारोदारी भिक्षा आणि दक्षिणा मागत फिरताना दिसत आहे. नंदीबैलवाला त्याचं पारंपरिक संगीत वाजवताना दिसतोय तर लोक येऊन मोबाईल स्कॅनिंग करुन नंदीबैलाला पैसे देताना दिसतात. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक या ठिकाणी आजही नंदीबैलवाले मोठ्या प्रमाणात दिसतात. आजही ते गावोगावी फिरून भिक्षा मागतात. लोकही त्यांना पैसाच्या स्वरुपात किंवा धान्यांच्या स्वरुपात मदत करतात.

Do you need any more evidence of the large-scale conversion to digital payments in India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात