वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र (Income tax return file) भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे. या मुदतीत विवरणपत्र भरले नाही तर पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.Do not delay filing of income tax return, otherwise penalty will have to be paid; December 31 deadline
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी आयटीआर (ITR) भरण्याची मुदत आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे.सरकारने दिलेल्या मुदत तारखेनंतर रिटर्न भरल्यास यापुढे ५ हजार रुपये दंड होऊ शकतो. करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांच्या आत असेल, तर उशीरा दंड म्हणून एक हजार रुपये देण्याचा नियम आहे. ५ लाखांपेक्षा जास्त कमाई असल्यास दंडाची रक्कम वाढणार आहे.
कोणाला दंड भरावा लागणार नाही
ज्यांचे एकूण उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त नाही, अशा करदात्यांना आयटीआर दाखल करण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाणार नाही. अशा करदात्यांना रिटर्न भरण्यास उशीर झाला तरी कलम २३४ एफ अंतर्गत दंड आकारला जाणार नाही.
विलंबित परतावा (बिलेटेड रिटर्न) म्हणजे काय?
आयटीआर भरण्याच्या तारखेनंतर जेव्हा एखादा करदाता रिटर्न भरतो, तेव्हा त्याला विलंबित परतावा (बिलेटेड रिटर्न) म्हणतात. हे आयकर कायद्याच्या कलम १३९ (४) अंतर्गत येते. कोणताही करदाता या कलमाखाली मागील विवरणपत्र दाखल करू शकतो.
दंडाची आकारणी कशी केली जाते?
विलंबित परतावा कलम २३४ एफ अंतर्गत दंड आकारण्यात येतो. या कलमानुसार, मुदतीनंतर आणि ३१ डिसेंबरपूर्वी आयटीआर दाखल करण्यासाठी पाच हजार रुपये दंड आहे. यानंतर दंडाची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत वाढते. जर करदात्याचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, आणि आयटीआर भरण्यास उशीर झाला, तर दंडाची रक्कम एक हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App