विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हेच भारतीय लोकशाहीचे सार, लालकृष्ण अडवानी यांचे स्वातंत्र्यदिनी प्रतिपादन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे सार विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर यामध्ये आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केले आहे. 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य फाळणीच्या शोकांतिकेसह होते. आपण स्वत:ही त्यात बळी पडलो होतो. सीमेच्या दोन्ही बाजूंच्या विस्थापित लोकांवर या शोकांतिकामुळे झालेला शारीरिक आणि भावनिक आघात आजही आठवतो असे त्यांनी म्हटले आहे. Diversity and freedom of expression is the essence of Indian democracy, says LK Advani on Independence Day

भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या निवेदनात, माजी उपपंतप्रधान आणि सर्वाधिक काळ भाजपचे अध्यक्ष राहिलेल्या अडवानी यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या संकल्पनेचे कौतुक केले. राष्ट्र प्रथम हे आपले तत्व असून राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वत: या तत्वाचे आपण नेहमी पालन केले आहे. भारतीय लोकशाहीचे सार विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आहे असा माझा दृढ विश्वास आहे. यामुळेच भारत एक यशस्वी लोकशाही देश बनला आहे. त्यामुळेच माझे सर्वांना आवाहन आहे की सामूहिकपणे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करा.



पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ ऑगस्ट आता फाळणीचा भयस्मरण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अडवानी म्हणाले, 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे फाळणीच्या शोकांतिकेसह होते.

अडवाणी म्हणाले की, भारत अनेक आव्हानांवर मात करून एक मजबूत, समृद्ध आणि मजबूत राष्ट्र बनला आहे .भारताकडून जागतिक नेतृत्व करण्याची अपेक्षा आहे. जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यापासून ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.

शेकडो शहीद आणि स्वातंत्र्य संग्रामातील वीरांच्या पवित्र स्मृतीला आदरांजली वाहताना ते म्हणाले, हा प्रसंग माझ्या शालेय दिवसांच्या 1930 च्या आठवणींना उजाळा देतो. त्यावेळी आमचे एकच स्वप्न आणि प्रार्थना होती की, आपला देश परकीय बंधनातून मुक्त झालेला पाहावा आणि परम वैभव-गौरवाच्या शिखराकडे वेगाने वाटचाल करावी.

सर्व स्तरातील भारतीयांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि आत्मविश्वासाची निर्माण झालेली भावना पाहूनआपल्याला परम आनंद झाल्याचे सांगून अडवानी म्हणाले, राष्ट्रसेवेत माझे आयुष्य समर्पित करण्याची संधी दिल्याबद्दल आणि भारतीय जनता पक्षासाठी काम करू शकलो याबाबत मी कृतज्ञ आहे.

Diversity and freedom of expression is the essence of Indian democracy, says LK Advani on Independence Day

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात