विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमधील असंतुष्ट नेत्यांचा जी-23 गट पुन्हा सक्रिय झाला आहे. पक्षात नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाली असली तरी आता या गटातच फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह १४ नेतेच सक्रीय राहिले आहेत.Dissatisfaction in the G-23 group of Congress dissidents, now only 14 leaders including Prithviraj Chavan are active
ऑगस्ट 2020 मध्ये तयार झालेल्या या गटात एकूण 23 नेते होते. पण, गुलाम नबी आझाद यांच्या घरी नुकत्याच झालेल्या एका बैठकीपासून यातील काही चर्चित नेत्यांनी अंतर राखल्याने या गटात बेबनाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जी-23 पासून 8 नेत्यांनी स्वत:ला दूर केले आहे. एक नेते जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची कास धरली आहे.
असंतुष्ट गटात आता केवळ 14 नेते उरलेत. यात गुलाम नबी आझाद, भूपेंद्रसिंह हुड्डा व पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. तर उर्वरित बहुतांश नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे किंवा संपणार आहे.गुलाम नबी आझाद यांच्या घरी बोलावण्यात आलेल्या डिनर पार्टीत 4 नवे नेतेही सहभागी झाले. पण, त्यातील दोघांचे काँग्रेसशी असणारे नाते केव्हाच संपुष्टात आले आहे.
गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या जी-23 गटाचे कर्तेधरते म्हणून पुढे आले होते. भाजप नेत्यांच्यासोबतच्या कथित जवळीकतेमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. आझाद यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात 80 च्या दशकात काश्मीरमधून केली. ते गांधी कुटूंबियांच्या जवळचे आहेत. प्रदिर्घ काळापासून ते राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येतात. पण, आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे.
पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. एकदा त्यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही काम केले. पण, त्यांची तळागाळातील लोकांवर मजबूत पकड नसल्याचे मानले जाते. केंद्राने चालू वर्षाच्या सुरूवातीलाच गुलाम नबी आझाद यांचा पद्मभूषण देवून सन्मान केला होता. माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचाही जी-23 गटात समावेश आहे.
त्यांनीही गांधी कुटूंबियांविरोधात मोर्चा उघडला आहे. यामुळे आता त्यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी कमी आहे. ााच राज्यांतील काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कपील सिब्बल यांनी गांधी कुटूंबाला पक्षाचे नेतृत्व सोडण्याचा सल्ला दिला. सिब्बल म्हणाले की, गांधी कुटूंबाने आता काँग्रेसचे नेतृत्व सोडून दुसºया एखाद्या नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे.
भूपेंद्र हुड्डा यांनी 2005 ते 2014 पर्यंत सलग 2 वेळा हरयाणाचे मुख्यमंत्री राहिलेत. पण, सध्या तेही असंतुष्टांच्या गर्दीत सामील झालेत. हरयाणा काँग्रेसमध्ये कमी लेखले जात असल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांचे राज्यातील जनतेशी मजबूत संबंध आहेत. जी-23 तील ते सर्वात ताकदवान नेते मानले जातात. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या राज बब्बर यांचाही असंतुष्ट गटात समावेश आहे.
बब्बर समाजवादी पक्षात होते. नंतर ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले. पंजाबच्या लुधियानातून मनीष तिवारी काँग्रेसचे लोकसभा सदस्य आहेत. पक्षात सध्या त्यांची उपेक्षा होत आहे. ते अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते. पण, गतवर्षी आलेल्या त्यांच्या एका पुस्तकामुळे धूमशान माजले. या पुस्तकाद्वारे त्यांनी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यावेळी मनमोहन सरकारने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थिति केले होते. त्यांचा पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या स्टार प्रचारकांतही समावेश नव्हता. यामुळे ते लवकरच काँग्रेसपासून दूर जातील असा अंदाज आहे.
संदिप दीक्षित असंतुष्ट गटाचे सर्वात सक्रिय सदस्य म्हणून पुढे आलेत. ते दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले होते. पाच राज्यांतील पराभवानंतर त्यांनीही पक्ष नेतृत्वावर सवाल उपस्थित केलेत.. ते दिल्लीच्या माजी मुख्यंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र असून, त्यांचे तळागाळातील लोकांशी फारसे संबंध नाहीत. पी.जे. कुरियन केरळचे कुरियन 2018 मध्ये राज्यसभेतून निवृत्त झालेत.
काँग्रेस हायकमांडने केलेल्या दुर्लक्षामुळे ते नाराज आहेत. शशी थरुर 2009 पासून केरळचे खासदार आहेत. गांधी कुटूंबियांच्या जवळचे आहेत. पण, गत काही काळापासून ते असंतुष्ट गटात गेलेत. वेगवेगळ्या कारणांमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी नोव्हेबर 2010 ते सप्टेबर 2014 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मोदी लाटेत काँग्रेसचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाला. तेव्हापासून चव्हाण राज्यात बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे ते असंतुष्ट गटात सहभागी झालेत.
आता नव्याने चार नेते या गटात सहभागी झाले होते. त्यातील एक परनीत कौर माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन दूर केल्यानंतर अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली आहे. 77 वर्षीय कौर यांनी यूपीए सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. पण, 2024 मध्ये पक्षाची उमेदवारी मिळण्याची चिन्हे नसल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिलेत.
दुसरे नेते 81 वर्षीय शंकर सिंह वाघेला यांनी फार वषार्पूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काही वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. पण, 2019 मध्ये ते तेथूनही बाहेर पडले. वाघेला आता पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांचे नाराज नेत्यांच्या गटात सहभागी होणे चचेर्चा विषय बनले आहे.
मणीशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चाय वाला, नीच सारखे शब्द वापरल्याबद्दल मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. काँग्रेसनेही मजबुरीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. नंतर त्यांना निलंबित करण्यात आले. आता त्यांचा राजकीय प्रभाव नसल्यासारखा आहे. एम. ए. खान तेलंगणातून दोनवेळा राज्यसभेचे सदस्य राहिले. काँग्रेसने 2021 च्या अखेरिस शिस्तपालन समिती स्थापन केली होती. त्यात खान यांना उपाध्यक्षपद देण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App