दिग्विजय सिंह पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायला हवे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.Digvijay Singh speaks Pakistani language, Sonia and Rahul Gandhi should answer
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिग्विजय सिंह पाकिस्तानची भाषा बोलत आहेत.यावर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायला हवे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.
काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचं ‘क्लब हाऊस चॅट’ लीक झाले आहे. सोशल मीडियावर क्लब हाऊस चॅटचा ऑडिओ व्हायरल होतोय. काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर जम्मू-कश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, असे या ऑडिओमध्ये दिग्विजय सिंह म्हणत आहेत.
सिंह एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. ‘काँग्रेस सत्तेत आल्यास काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल’ असे त्यात म्हणत आहेत.पात्रा म्हणाले, दिग्विजय सिंह तेच नेते आहेत
ज्यांनी पुलवामा हल्ला एक दुर्घटना आणि २६/११ चा हल्ला आरएसएसचा कट असल्याचं वक्तव्य केले होते. भारताला बदनाम करण्यासाठी आणि मोदींना पंतप्रधान पदावरून हटवण्याचा कट रचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिटचाच हा एक भाग आहे. पाकिस्तानसोबत काँग्रेसचे संबंध आहेत आणि दिग्विजय यांचं वक्तव्यही त्याकडे इशारा करत आहे.
संसदेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणतात की काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे यावर सदनात चर्चा होऊ शकत नाही. चौधरी यांना सोनिया गांधी यांचंही समर्थन होतं आणि काँग्रेसचं या प्रकरणावर काय भूमिका होती हे सगळ्या जगानं पाहिलं. मणिशंकर अय्यर यांनी मोदींना हटवण्याचाही उल्लेख केला. या सगळ्यांचं नेतृत्व राहुल गांधी करत आहेत, असा आरोप पात्रा यांनी केला.
इकडे राहुल गांधींनी काश्मीरमध्ये हजारो लोक मारले गेल्याचं ट्विट केलं तर तिकडे लगेचच इमरान खान डोजियर घेऊन यूएनमध्ये पोहचले…’ असं म्हणत काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० परत लागू करण्यासाठी काँग्रेसकडून कट रचला जात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App