वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात डिजिटल पेमेंट व्यवहार करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. अगदी चहा, किराणा मालाच्या दुकानापासून मोठ्या स्टोअर्समध्ये डिजिटल पेमेंट सूचनांचे फलक झळकत आहेत. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये ५५० टक्क्यांची वाढ झाली आहे. Digital payments soar in the country, From small Shops to large stores
गुगल पे, पेटीएम, फोन पे आणि भीमसारख्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला १२२ कोटीची देवाणघेवाण होत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला तर या डिजिटल व्यवहारात ५५०टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१६-१७मध्ये १००४ करोड डिजिटल व्यवहार झाले होते. हा आकडा २०२० – २१ मध्ये ५५५४ कोटीपर्यंत पोचला आहे. २१ च्या एप्रिल-मे महिन्यात डिजिटल व्यवहाराचा आकडा २०२० च्या तुलनेत १०० टक्के जास्त वाढला आहे. क्यूआर कोडने यूपीआय पेमेंटची सुविधा आहे. याशिवाय आता ग्राहकांना अनेक सुविधा देण्यावर काम सुरू आहे. पाच वर्षांमध्ये या तंत्रात आणखी बदल होणार आहे.
पेटीएम अव्वल
मोबाईल पेमेंटच्या दुनियेत सध्यातरी पेटीएम अव्वल आहे. अनेकांचा पेटीएम वापरण्याकडे कल आहे. पेटीएमकडे सुमारे एक कोटी 60 लाख व्यावसायिक आस्थापनांनी पेमेंट भागीदारी केली आहे.
भविष्यात तंत्रज्ञानात होतील बदल
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App