भारतात 4 बँकांची Digital Currency लवकरच बाजारात; ‘या’ चार बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयचा डिजिटल चलनाचा पायलट प्रकल्पाने गती घेतली आहे. या पायलट प्रकल्पाचा वापर आरबीआय देशातील मोठ्या बँकांमध्ये मोठ्या व्यवहारात करण्यात येत आहे. असे असताना सर्वसामान्य नागरिकांना हे डिजिटल चलन कधी वापरण्यास मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न विचारणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता लवकरच हा डिजिटल रूपया म्हणजे Digital Rupee, Currency तुमच्याकडे असणार आहे. Digital Currency of 4 banks in India soon in the market

‘या’ चार बँकांना मिळाली परवानगी

मध्यवर्ती बँकेने डिजिटल चलन आता सर्वसामान्यांच्या हातात वापरण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पायलट प्रकल्प तयार केला आहे. हा कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चार बँकांवर जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तयार करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, सर्वसमान्यांपर्यंत हे चलन पोहचविण्यासाठी आरबीआयने एक यादी तयार केली आहे. या बँकांमध्ये HDFC Bank, ICICI Bank, State Bank of India, IDFC First Bank या चार बँकांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.



हे डिजिटल चलन बाजारात आणल्यानंतर सध्या वापर होत असलेल्या डिजिटल पेमेंट अॅपसोबत लिंक करायचा किंवा नाही, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्याविषयीच्या नियमांची चौकट असणे आवश्यक असल्याने यावर विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, हे चलन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सीबीडीसी पायलट प्रकल्प तयार करत आहे. त्यासाठी पाच बँकांची यादी तयार करण्यात आली आहे. यापैकी वरील चार बँकांची नावे समोर आली आहेत. तसेच काही ग्राहक आणि व्यापाऱ्यांना या डिजिटल रुपयाच्या पायलेट प्रकल्पात सहभागी करुन घेतल्यानंतर पुढे सर्वांसाठी हे डिजिटल चलन खुले करण्यात येणार आहे.

Digital Currency of 4 banks in India soon in the market

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात