Digital Currency : बजेटमध्ये मोठी घोषणा, RBI लाँच करणार ब्लॉक चेनवर आधारित डिजिटल चलन, क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर ३० टक्के कर, वाचा सविस्तर…


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यातील एक डिजिटल चलनही आहे. भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षी डिजिटल चलन लाँच करणार आहे. हे ब्लॉक चेन आधारित चलन असेल. अर्थसंकल्पीय भाषण वाचताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ब्लॉक चेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी केले जाईल. ते 2022-23 च्या सुरुवातीला रिलीज होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. Digital Currency Big announcement in budget, RBI to launch blockchain based digital currency, 30% tax on cryptocurrency income, read more …


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यातील एक डिजिटल चलनही आहे. भारतीय रिझर्व्ह बँक या वर्षी डिजिटल चलन लाँच करणार आहे. हे ब्लॉक चेन आधारित चलन असेल. अर्थसंकल्पीय भाषण वाचताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ब्लॉक चेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी केले जाईल. ते 2022-23 च्या सुरुवातीला रिलीज होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

या वर्षीच सुरू होणार डिजिटल चलन

RBI या वर्षी ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी करणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या कमाईवर 30% कर आकारला जाईल. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, आभासी डिजिटल मालमत्तांच्या कर आकारणीत बदल करण्यात आले आहेत. अशा कोणत्याही मालमत्तेच्या हस्तांतरणावर 30% कर लागेल. कोणतीही सवलत दिली जाणार नाही. कॉर्पोरेट कर 18% वरून 15% करण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल चलन जारी केले जाईल. ते 202-23 पासून RBI द्वारे जारी केले जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

डिजिटल रुपयाचे काय आहेत फायदे?

RBI 2022-23 मध्ये डिजिटल चलन आणणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेचे डिजिटल चलन डिजिटल रुपया असेल. हे डिजिटल व्यवहारातील महत्त्वाचे ठरेल. डिजिटल बँकिंगचे अपेक्षित फायदे यातून मिळू शकतील.

भारत क्रिप्टो उद्योगाचा बादशहा बनू शकतो

तज्ज्ञांच्या मते, भारतातील क्रिप्टो उद्योग प्रचंड वाढला आहे. जर आपण याचे भांडवल करू शकलो, तर भारत संपूर्ण जगात क्रिप्टो उद्योगात आघाडीवर असेल. देशातील स्टार्टअप प्रकल्प सातत्याने प्रगती करत आहेत, ज्यांच्या मदतीने भारत क्रिप्टो मार्केटमध्ये मोठा खेळाडू बनू शकतो. सरकार या बाबतीत ठोस पावले उचलली, तर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक वाढेल.

क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्याव्यतिरिक्त सरकार क्रिप्टो कर आकारणीबाबत स्पष्ट नियमदेखील करेल. कोरोना महामारीच्या अनेक लाटांशी झुंज देऊनही देशाची अर्थव्यवस्था सुधारली आहे. क्रिप्टोकरन्सी नियामक स्पष्ट झाल्यामुळे, क्रिप्टो क्षेत्रात तेजी येईल, जी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन बनविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.

Digital Currency Big announcement in budget, RBI to launch blockchain based digital currency, 30% tax on cryptocurrency income, read more …

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात