प्रतिनिधी
मुंबई : महायुती जिंकूनही २०१९ मध्ये एका बाजूला शिवसेनेने भाजपला बाजूला करून दोन्ही काँग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली होती, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला विश्वासघात झाल्याने निराश झालेले देवेंद्र फडणवीस कोणत्याही मार्गाने सरकार स्थापन्याच्या तयारीत होते आणि अजित पवार यांनी ५४ आमदारांची नुसती यादी घेऊन आले त्या आधारे फडणवीसांनी पहाटेच शपथ घेतली. परिणामी पुढच्या दोन दिवसांत सरकार पडले, अडीच वर्षांनी फडणवीसांनी पुन्हा सरकार स्थापण्याची तयारी केली आहे, यावेळी मात्र पहाटेची चूक सुधारली आहे.
११६ मताधिक्य असलेल्या फडणवीसांना २९ आमदारांची गरज आहे, विधान परिषद निवडणुकीत त्यांनी ही मॅजिक फिगर मिळवल्याचा दावा केला आहे, दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये गेले असून नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या, त्यांच्या सोबत १३ आमदार असल्याचा कुणी दावा करत आहे, तर कुणी २४ आमदार असल्याचे म्हणत आहे. मात्र काहीही असेल तरी फडणवीसांनी प्रत्यक्ष आमदारांसह शिंदेंना सोबत ठेवल्याने अजित पावरांप्रमाणे केवळ कागदावरील लिस्टवर विश्वास ठेवलेला नाही.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
– सरकार कोसळण्यापूर्वी घडामोडी
– आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या प्रत्येक आमदाराशी बोलून त्यांची खरोखर शिवसेनेतून बाहेर पडण्याची मानसिकता आहे का, हे तपासून त्याची खात्री पटवून घेतील.
– दोन दिवसांत राज्यपालांना ठाकरे – पवार सरकार अल्पमतात आल्याचा दावा करतील.
– राज्यपाल ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगतील, त्याकरता फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश देतील.
– मागील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे अशा वेळी फ्लोअर टेस्टसाठी अधिकचा वेळ देता येणार नाही.
– त्यामुळे ७ दिवसांत ही फ्लोअर टेस्ट घेण्यात येईल, त्याकरता विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्यावे लागेल. विधानसभा अध्यक्ष नियुक्त नसला तरी प्रभारी अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली ती घेता येईल.
– फ्लोअर टेस्टमध्ये सरकार कोसळले तर राज्यपाल फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App