पीएम मोदी यांनी संसदेत उपस्थित राहण्याचा इशारा देऊनही भाजप खासदारांच्या मनोवृत्तीत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय संसदेच्या इतिहासात तिसऱ्यांदा सोमवारी असे घडले. Despite PM Modi’s warning, 10 BJP MPs are absent in Parliament, the Prime Minister had said- change yourself, otherwise change will happen!
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पीएम मोदी यांनी संसदेत उपस्थित राहण्याचा इशारा देऊनही भाजप खासदारांच्या मनोवृत्तीत कोणताही बदल झालेला नाही. भारतीय संसदेच्या इतिहासात तिसऱ्यांदा सोमवारी असे घडले.
सोमवारी 20 हून अधिक तारांकित प्रश्न घेण्यात आले परंतु आश्चर्याची गोष्ट बाब म्हणजे ज्यांची नावे प्रश्नासाठी समाविष्ट करण्यात आली होती ते 10 भाजप खासदार अतिरिक्त प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित नव्हते. दरम्यान, आज सकाळी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत या खासदारांचा क्लास लागू शकतो.
गत आठवड्यात मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांनी सर्वपक्षीय खासदारांना आपल्या सवयी बदला अन्यथा परिवर्तन घडेल, असा इशारा दिल्यानंतर हा प्रकार घडला. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भाजपचे लोकसभेतील मुख्य व्हीप राकेश सिंह, बंगालचे खासदार सुकांत मजुमदार, बेंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या, पूर्व चंपारणचे खासदार सुकांता मजुमदार यांचा समावेश होता. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल, कौशांबी भाजप खासदार विनोद कुमार सोनकर आणि पाली राजस्थानचे खासदार पीपी चौधरी यांच्या नावांचा समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App