गांधी मार्गावर जीना टॉवर, भारतातील जिनांच्या एकमेव स्मारकाचे नाव बदलण्याची मागणी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात गांधी मार्गावर असलेली इमारत जिना टॉवरचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनी या इमारतीवर हिंदू वाहिनीने याठिकाणी तिरंगा फडकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता या टॉवरचे नाव बदलण्याची मागणी राज्यातील भाजपने केली आहे.Demand for renaming of Jinnah Tower on Gandhi Marg, the only Jinnah monument in India

राज्याचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना ही केवळ राजकीय नौटंकी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 1945 मध्ये बांधलेला हा टॉवर महात्मा गांधी रोडवर आहे. भारतातील जिना यांच्या नावाचे हे एकमेव स्मारक आहे. जिना यांच्या स्मरणार्थ हा मिनार बांधण्यात आला होता.



हा टॉवर आंध्रमधील गुंटूर येथील समुद्रकिनारी आहे. हा उंच टॉवर शहरातील मुख्य बाजारपेठेच्या मध्यभागी उभा आहे. त्याच्या नावावरून येथे कधीही वाद झाला नाही. गुंटूरचे लोक या टॉवरला शहराची शानही म्हणतात. योगायोगाने हा टॉवर ज्या रस्त्याला आहे त्या रस्त्याला महात्मा गांधी रोड असे नाव देण्यात आले आहे.

Demand for renaming of Jinnah Tower on Gandhi Marg, the only Jinnah monument in India

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात