साध्या पासपोर्टवर अमेरिकेला जायचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा; दिल्ली कोर्टाने दिली 3 वर्षांसाठी एनओसीला मान्यता


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : साध्या पासपोर्टवर अमेरिकेला जाण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने त्यांना साधा पासपोर्ट मिळवण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्यायला 3 वर्षांसाठी मान्यता दिली आहे.Delhi’s Rouse Avenue Court partly allows Congress leader Rahul Gandhi’s plea seeking NOC for issuance of a fresh ordinary passport.

राहुल गांधींनी खासदारकी रद्द झाल्यानंतर डिप्लोमॅटिक पासपोर्ट ऐवजी साध्या पासपोर्टची मागणी केली होती आणि त्या संदर्भात कोर्टाकडे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अर्ज केला होता हा अर्ज दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने अंशतः स्वीकारला असून 3 वर्षांसाठी त्यांना साधा पासपोर्ट द्यायला हरकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



राहुल गांधी येथे 28 मे रोजी अमेरिकेला रवाना होत आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सावरकर जयंतीचा मुहूर्त सादर नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. पण काँग्रेसने आधीच जाहीर केल्याप्रमाणे पक्षाचे खासदार या समारंभावर बहिष्कार घालणार आहेत. त्यामुळे राहुल गांधींनी त्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

अर्थात राहुल गांधी हे आपला अमेरिका दौरा आधी 31 मे रोजी सुरू करणार होते. पण नंतर त्यांनी तो अलीकडे ओढून 28 मे रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काँग्रेसने नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कारा निर्णय घेतला ही वस्तुस्थिती आहे.

Delhi’s Rouse Avenue Court partly allows Congress leader Rahul Gandhi’s plea seeking NOC for issuance of a fresh ordinary passport.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात