विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली सरकारने आता आंतरराष्ट्रीय बाजारातून तब्बल १ कोटी लसमात्रा खरेदी करण्यासाठी जागतिक टेंडर काढले आहे. दिल्लीतील सर्व नागरिकांना पुढच्या तीन महिन्यांमध्ये लसीकरण करायचे तर दरमहा ८० लाख डोस दिल्लीला मिळाले पाहिजेत,Delhi wants 80 lack doses per month
अशी राज्य सरकारची मागणी आहे. मात्र केंद्राकडून होणारा पुरवठा त्या तुलनेत अत्यंत अल्प आहे. अखेर दिल्ली सरकारने १ कोटी लसीची खरेदी स्वतः करण्याचा निर्णय घेऊन हे ग्लोबल टेंडर जारी केले आहे.
यापूर्वी तरी कंपनीने दिल्लीला थेट डोस विकण्यासाठी नकार दिल्याचे प्रकरण ताजे असल्याने जागतिक बाजारपेठेतील चीन वगळता कोणत्या देशाची कंपनी दिल्ली सरकारला थेट लसी विकणार हा मुद्दा निर्माण झाला आहे.
यासाठी लिलाव अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ जून ही आहे. जे उत्पादक यात अर्ज करतील त्यांना भारतीय आरोग्य नियामक यंत्रणा, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून अधिकृत मान्यता मिळणे आवश्यक असल्याचेही दिल्ली सरकारने स्पष्ट केले आहे.
ऑर्डर दिल्यानंतर पहिल्या ७ दिवसांमध्ये तसेच त्यानंतर आठव्या, सोळाव्या २४ व्या ३१ व्या आणि ४५ व्या दिवशी किती लसी पुरवणार याचा स्पष्ट उल्लेख आपल्या अर्जात करावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App