दिल्ली मेट्रो अनिल अंबानींच्या रिलायन्सला हजारो कोटी देण्यास तयार; पण, हा प्रश्न अजूनही कायम


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) रिलायन्स इन्फ्राला हजारो कोटी परत करण्याचे मान्य केले आहे. पण, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणते की रक्कम देण्यासाठी आणखी वेळ लागेल. Delhi Metro ready to pay thousands of crores to Anil Ambani’s Reliance; But, the question still remains

आता २२ डिसेंबरला सुनावणी

दिल्ली एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रो प्रकरणात दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनिल अंबानी समूहाची कंपनी रिलायन्स इन्फ्राला हजारो कोटी रुपये परत करण्याचे मान्य केले आहे. मात्र, देणे किती यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरूच आहे. दिल्ली उच्च न्यायालय आता २२ डिसेंबरला या प्रकरणी निकाल देऊ शकते.


कर्जबाजारी अनिल अंबानी समूहाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेसप्रकरणात २८०० कोटी मिळणार


या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने डीएमआरसीच्या विरोधात निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रिलायन्सने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) म्हणते की रक्कम देण्यासाठी आणखी वेळ लागेल. हायकोर्टाने डीएमआरसीला विचारले, ‘जेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन सर्व कायदेशीर लढाई हरला आहात? तुमच्याकडे यापुढे कायदेशीर पर्याय नाही. मग पैसे देण्यास उशीर का करताय?’ यावर डीएमआरसीने उच्च न्यायालयाला सांगितले की, ‘आम्ही ४८ तासांत रिलायन्सला १,००० कोटी रुपये देऊ शकतो. मात्र उर्वरित रकमेसाठी बँकांकडून पैशांची व्यवस्था करण्यासाठी वेळ लागतो.

रकमेवरून वाद

दिल्ली मेट्रोचे म्हणणे आहे की त्यांना फक्त ५००० कोटी रुपये परत करावे लागतील, तर दुसरीकडे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेसने (DAMEPL) ८००० कोटी रुपये परत मिळावेत, असा दावा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्णयानुसार रिलायन्सला सुमारे ५२०० कोटी रुपये मिळू शकतात.

Delhi Metro ready to pay thousands of crores to Anil Ambani’s Reliance; But, the question still remains

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात