Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत. Delhi CM Arvind Kejriwal Isolate Himself As His Wife Sunita Kejriwal Tested Positive For corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. यामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे. त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यावरही घरीच उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्या दररोज नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सोमवारी 23,500 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर रविवारी 24 तासांत सुमारे 25,500 रुग्ण आढळले. संसर्गाचे प्रमाण 24 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. याचाच अर्थ दिल्लीत प्रत्येक दहामधील तिसरा व्यक्ती कोरोनाबाधित असू शकतो. यामुळे दिल्लीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिल्ली में आज से लॉकडाउन शुरू हो चुका है। ये फ़ैसला आपके स्वास्थ्य और सुरक्षा के मद्देनज़र लिया गया है। कृपया इसमें सरकार का सहयोग करें, अपने घर पर ही रहें, संक्रमण से बचकर रहें। — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 20, 2021
दिल्ली में आज से लॉकडाउन शुरू हो चुका है। ये फ़ैसला आपके स्वास्थ्य और सुरक्षा के मद्देनज़र लिया गया है। कृपया इसमें सरकार का सहयोग करें, अपने घर पर ही रहें, संक्रमण से बचकर रहें।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 20, 2021
वाढत्या संसर्गामुळे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सोमवारी दिल्लीत लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनचा आज पहिला दिवस आहे. सोमवार, 26 एप्रिल सकाळपर्यंत लॉकडाऊन असेल. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. लोकांना उपचार घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. रुग्णालयात बेडची मोठी कमतरता आहे. उपचार घेण्यासाठी बेड किंवा औषधेही मिळत नाहीत. काही ठिकाणी ऑक्सिजनच्या तुटवड्याचाही सामना करावा लागत आहे. तथापि, केंद्राने यात लक्ष घातले असून दिल्लीसह इतर राज्यांना ऑक्सिजनचा सुरळित पुरवठा व्हावा यासाठी तातडीची पावले उचलली आहेत.
Delhi CM Arvind Kejriwal Isolate Himself As His Wife Sunita Kejriwal Tested Positive For corona
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App