वेड्या मुलांची आईसाठी वेडी माया, आपल्याकडे ठेऊन घेण्यासाठी चढले कोर्टाची पायरी


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : वृध्द मातापित्यांना सांभाळत नसल्याने कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होत असताना भोपाळमध्ये वेड्या मुलांची आईसाठी वेडी माया समोर आली आहे. आईला आपल्याकडे ठेऊन घेण्यासाठी चार मुलांनी चक्क कोर्टात धाव घेतली.Crazy love for the mother of crazy children, climbed the steps of the court for custody

वृद्ध आईला आपल्याकडे ठेवण्यासाठी चार भाऊ आमने-सामने आले आणि आईच्या ताब्यासाठी कोर्टापर्यंत गेल्याची घटना समोर आली आहे. अखेर ८५ वर्षीय आई सरजूबाईच्या इच्छेनुसार ती छोट्या मुलाकडे राहील, असा निर्णय झाला. जेव्हा कधी तिची आपल्या इतर मुलांना भेटण्याची इच्छा होईल, तेव्हा ती जाऊ शकेल. ही घटना मध्य प्रदेशमधील देवास येथे घडली आहे.आॅगस्टमध्ये सीआयएसएफमधून निवृत्त झालेला सर्वात लहान मुलगा प्रल्हादसिंग उर्फ मोनू हे त्यांच्या आईला भेटण्यासाठी मोठे भाऊ परमानंद यांच्याकडे गेले. मात्र परमानंद यांनी त्यांना आईला भेटू दिले नाही. त्यानंतर मोनू यांनी २ सप्टेंबर रोजी एसडीएम कोर्टामध्ये यासंदर्भात अर्ज दिला.

या अर्जामध्ये त्यांनी सांगितले की, मला माझ्या आईला भेटू दिले जावे. मी त्यांना आपल्याकडे ठेऊ इच्छिते. त्यावर एसडीएम प्रदीप सोनी यांनी कलम ९७ आणि ९८ अन्वये सर्च वॉरंट जारी केले. त्यानंतर पोलीस वृद्ध आईला जबाब नोंदवण्यासाठी परमानंद यांच्या घरातून कोर्टात घेऊन आले.

तिथे या आईने ती धाकट्या मुलाकडे राहू इच्छित असल्याचे सांगितले. माझ्या स्वर्गिय पतींनी मला धाकट्या मुलाकडे राहायला सांगितले होते, अशी माहिती या आईने कोर्टात दिली.आईच्या जबाबानंतर एसडीएमने तिला तिच्या धाकट्या मुलासोबत राहण्यास सांगितले. तसेच आई कुठल्याही मुलाकडे तिच्या इच्छेनुसार राहू शकते, असे आदेश दिले.

धाकटा भाऊ आईचा योग्य पद्धतीने सांभाळ करणार नाही, अशी बाकीच्या तीन मुलांची तक्रार आहे. त्यामुळे आमचे पथक धाकट्या भावाच्या घरी जाऊन पाहणी करणार आहे. आईला आपल्याकडे ठेवण्यावरून सरजूबाईंच्या चारही मुलांमध्ये कोटार्बाहेर वाद झाला. यावेळी विक्रम सिंह, कंचन सिंह, परमानंद या तिघांनी प्रल्हाद आणि त्यांच्या कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद एवढा वाढला की, पोलिसांना पाचारण करावे लागले.

दरम्यान, प्रल्हाद, त्यांची पत्नी आणि मुलीला मारहाण केल्या प्रकरणी विक्रम कंचन आणि परमानंद यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात अजून एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सरजूबाईच्या नावावर काही जमीन आहे. तसेच चारही भाऊ त्यामुळेच आईला आपल्याकडे ठेवू इच्छित आहेत. त्यांच्यामते आई ज्याच्याकडे राहील त्यालाच जमीन मिळणार आहे.

Crazy love for the mother of crazy children, climbed the steps of the court for custody

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण