विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही आता भाजपच्या पावलावर पाऊल टाकले आहे. पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना भाजपकडून बाजूला करण्यात आले. त्याप्रमाणे आता कम्युनिस्ट पक्ष ७५ वर्षांपुढील व्यक्तींना केवळ पक्षाच्या केंद्रीय समितीत स्थान देणार आहे. पक्षाच्या २३ व्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. CPM will retire old leaders from politics
भाजपने वयोवृद्ध नेत्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान देत सक्रीय राजकारणातून निवृत्त केले. त्यात लालकृष्ण आडवानी, मुरलीमनोहर जोशींसारखे दिग्गज नेतेही सुटले नाहीत. अर्थात त्याचा भाजपला फायदाच झाला. त्यामुळे डावे पक्षही असाच विचार करत आहेत.
पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक नुकतीच झाली. त्याबद्दल माहिती देताना पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, केरळ, पश्चिकम बंगाल, तमिळनाडू, आसाम या राज्यात झालेल्या निवडणुकांमधील निकालावर चर्चा केंद्रीय समितीच्या बैठकीत झाली. अमेरिकेसारखे देश कोरोना काळातही त्यांची अर्थव्यवस्था वाचविण्याचा प्रयत्न करीत असून, पॅकेज जाहीर करीत आहेत. त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिकावे. उद्योगांना कर्जाऊ मदत करण्यापेक्षा आर्थिक पॅकेज जाहीर करावे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App