विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या लसीकरण अभियानाचे काँग्रेस नेते खासदार शशी थरुर ( यांनी कौतुक केलं आहे. कोविन अॅप हे जबरदस्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सुरू केलेल्या कोविन अॅपवर शशी थरुर सातत्याने टीका करत होते.Covin app terrific, Congress MP Shashi Tharoor praised the Modi government
मात्र, आता या अॅपचे त्यांनी कौतुक केले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी नेहमी केंद्र सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक करत असतो. मी सरकारच्या टीकाकारांपैकी एक होतो, पण आता त्यांनी यात काहीतरी विशेष काम केले आहे. तुम्हाला आता या कोविन अॅपद्वारे थेट तुमच्या व्हॅट्सअॅपवर तुमचे लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळेल. हे खूप सोपं आणि वेगवान आहे.
50 कोटी नागरिकांचं लसीकरणभारतात लसीकरण अभियान वेगानं सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतानं 50 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले होते. कोविड-19 विरोधात भारताने एक उंची गाठली आहे.
आपण आता 50 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. आगामी काळात उर्वरित सर्व नागरिकांना सबको टीका, मुफ्त टीका कार्यक्रमांतर्गत लस देण्यात येईल, असे ते म्हणाले होते.
महत्तवाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App