वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : न्यायव्यवस्थेने काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केली. Counting benefits of digitisation, Justice Chandrachud calls for change in attitude
केरळ उच्च न्यायालय आणि संपूर्ण राज्य न्यायपालिकेसाठी ई-फायलिंग मॉड्यूल्सचे उदघाटन चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. त्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले, ” आपण आपली मानसिकता आणि धारणा बदलली की, तंत्रज्ञान स्वीकारणे सहज शक्य होईल. त्या दिशेने प्रयत्न झाले की, त्याचे इतर अनुकरणं सर्वत्र केले जाईल.
डिजिटायझेशनचे फायदे अनेक असल्याचे सांगताना ते म्हणाले, यामुळे वेळ वाचून न्यायदान झटपट होण्यास चालना मिळणार आहे. केसेसच्या ई-फायलिंगवर बोलताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे याचिकाकर्ते आणि बारच्या सदस्यांची मोठी सोय होणार आहे. त्यांच्यावरील प्रवासाचे ओझे कमी होते, त्यांना घरे किंवा कार्यालयातूनही सहज अर्ज भरता येईल. जनतेने मानसिकता बदलली तर अनेक
प्रश्न सुटतील असे सांगताना ते म्हणाले, न्यायव्यवस्था तंत्रज्ञानाने युक्त झाली तर पेपरलेस काम करता येने शक्य होईल. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे प्रमुख न्यायमूर्ती चंद्रचूड आहेत. ते म्हणाले की, समिती विद्यमान खटल्यांचे डिजिटायझेशन आणि न्यायालये पेपरलेस करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा मोठा प्रयत्न करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App