आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन, पंधरा पट धोकादायक, मृत्यूंचे प्रमाण वाढणार


आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे शास्त्रज्ञ म्हणतात की हे सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.Corona’s new strain found in Andhra Pradesh, fifteen times more dangerous, will increase deaths


विशेष प्रतिनिधी

हैैद्राबाद : आंध्रप्रदेशात कोरोनाचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. त्याला एपी स्ट्रॅन आणि एन440के असे नाव देण्यात आले आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्यूक्लर बायोलॉजी चे शास्त्रज्ञ म्हणतात की हे सध्याच्या व्हायरसपेक्षा हा स्ट्रेन 15 पट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.

या स्ट्रेनने संक्रमित रूग्ण 3-4 दिवसात हायपोक्सिया किंवा डिस्पेनियाला बळी पडतात. याचा अर्थ असा आहे की रुग्णाच्या फुफ्फुसांपर्यंत श्वास जाणे थांबते. जर योग्य वेळी उपचार आणि आॅक्सिजन सपोर्ट मिळाला नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो. सध्या भारतात यामुळेच बहुतेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत.



आंध्रप्रदेशातील कुर्नुल येथे प्रथम या स्ट्रेनची ओळख पटली. हा सामान्य लोकांमध्ये खूप लवकर पसरतो. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे चांगली प्रतिकारशक्ती असलेले लोक देखील या विषाणूसमोर अपयशी ठरत आहेत. ज्याची प्रतिकारशक्ती मजबूत आहे अशा लोकांनासुद्धा या विषाणूची बाधा होते. या नवीन स्ट्रेनमुळे लोकांच्या शरीरात सायटोकीन स्टॉर्मची समस्या येते.

शास्त्रज्ञांनुसार हा स्ट्रेन तरूण आणि मुलांसाठी जास्त धोकादायक आहे. जर वेळेत या स्ट्रेनची साखळी तुटली नाही तर कोरोनाची ही दुसरी लाट आणखी भयानक बनू शकते. हा सध्याचा स्ट्रेन इ1617 आणि इ117 पेक्षा अधिक धोकादायक आहे.

दक्षिण भारतात हा व्हायरस आपले पाय पसरत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगाणामध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या दक्षिण भारतात इ.1, इ.1.1.7, इ.1.351,इ.1.617 आणि इ.1.36 या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळत आहेत.

देशात इ.1.1.7 या व्हेरियंटची सर्वाधिक नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. मात्र आता समोर आलेला विषाणू सर्वाधिक घातक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काळजी घेणं गरजेचं आहे.

Corona’s new strain found in Andhra Pradesh, fifteen times more dangerous, will increase deaths

महत्त्वाची बातमी

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात