वृत्तसंस्था
बंगळूर : कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. गेल्या 24 तासांत 346 जणांचा मृत्यू झाला असून 50 हजार 112 जणांना कोरोना झाला आहे.Corona’s havoc in Karnataka; In 24 hours Over 50,000 affected, 346 killed
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताच मुख्यमंत्री बी. एस. येडीयूरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता.
परंतु, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आता राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यापेक्षा दुसरा पर्याय दिसत नसल्याचे स्पष्ट होत आहे. रुग्णसंख्येने 24 तासांत 50 हजारांचा आकडा पार करणे ही घोक्याची घंटा मानली जात आहे.
रुग्णसंख्या 50 हजारावर आणि बरे होणाऱ्यांची संख्या 26 हजार 841 आहे. रुग्णसंख्या आणि बरे होण्याचे प्रमाण यात प्रचंड तफावत आहे. दरम्यान, एकूण कोरोना प्रकरणे 17 लाख 41 हजार 46 असून ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 87 हजार 288 आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App