सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील ४५ वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील 45 वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने राज्य सरकारला या संदर्भात पत्र पाठवले आहे. कार्यालयात कोरोनाचे लसीकरण करण्यात यावे. एका वेळी 100 जणांना लस देण्यात येणार आहे. Corona vaccine for employees under 45 in government and semi-government offices

केंद्र सरकारने कार्यालयातील 45 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. आता मोहिम अधिक व्यापक करण्यासाठी कामाच्या ठिकाणी लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

आतापर्यंत 8.40 कोटींहून अधिक डोस

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनावरील प्रभावी लसींचे 8.40 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 89 लाख 60 हजार 966 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 53 लाख 77 हजार 11 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत फ्रंट लाइन 97 लाख 30 हजार 304 कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 42 लाख 68 हजार 788 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये लसीकरणाचं काम 

सध्या भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यात आलेलं कोरोना लसीकरणाची मोहिम तिसऱ्या टप्प्यांत पोहोचली आहे. देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीकरणाचं काम केलं जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आलं होतं.

दरम्यान, देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 1 कोटी 27 लाख 99 हजारांवर पोहोचला आहे. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 208 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात जवळपास 1 कोटी 17 लाख 89 हजार 759 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच वर्तमान काळात कोरोना अॅक्टिव रुग्णांचा आकडा 8 लाख 43 हजारांच्या पार पोहोचला आहे.

Corona vaccine for employees under 45 in government and semi-government offices

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात