Corona Vaccine: कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ आवश्यक ;जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. लसीकरण सुरु आहे. अनेकांनी दोन डोस घेतले आहेत. असे असताना वर्षाला ‘बूस्टर डोस’ घेणे आवश्यक आल्याचे जागतिक संघटनेने म्हंटले आहे. कोरोना रोखण्यासाठी लस घेणे आवश्यकच आहे. परंतु कालांतराने कोरोना विषाणू आपले स्वरूप बदलत आहे. त्यामुळे तो अँटिबॉडीना दादा लागू देत नाही. त्यामुळे या धोक्यापासून वाचण्यासाठी लसीमध्ये नियमित रुपात अपडेट केले जाईल. Corona Vaccine: Booster Dosage Required Every Year to Prevent Corona



लस उत्पादक मॉडर्ना इंक आणि फायझर इंक त्यांचे जर्मन भागीदार बायोएनटेक यांच्यासह बूस्टर शॉटच्या आवश्यकतेबाबत जोर देत आहेत.
संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाच्या व्हेरिएंट आणि त्यावर लसीचा होणारा प्रभाव पाहता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटना(WHO) त्यांनी एका रिपोर्टनुसार अंदाज लावला आहे की, ज्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे, त्यात वृद्ध असतील अशांना कोरोना व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी प्रत्येक वर्षाला बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते असे म्हटलं आहे.

Corona Vaccine: Booster Dosage Required Every Year to Prevent Corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात