Corona Updates : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 85 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता 13 लाखांच्याही पुढे गेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात दररोज दीड लाखांहून जास्त रुग्ण आढळत आहेत. Corona Updates In India Latest News
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाने हाहाकार उडवला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळत आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही दररोज वाढ होत आहे. पहिल्यांदाच मागच्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 85 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आता 13 लाखांच्याही पुढे गेले आहेत. मागच्या काही दिवसांपासून देशात दररोज दीड लाखांहून जास्त रुग्ण आढळत आहेत.
वर्ल्डोमीटरनुसार, मागच्या 24 तासांत 1.85 लाखांहून जास्त नवे रुग्ण आढळल्यानंतर भारतातील एकूण बाधितांचा आकडा हा 1.38 कोटींच्याही पुढे गेला आहे. तर 1000 हून जास्त मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंचा आकडा 1,72,115 वर गेला आहे. मागच्या काही दिवसांपासून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढण्यासोबतच कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दरातही घट नोंदवण्यात आली आहे. यामुळे चिंता वाढली आहे.
मागच्या 24 तासांतील नवे रुग्ण : 1,85,248 मागच्या 24 तासांतील एकूण मृत्यू : 1,026 मागच्या 24 तासांतील एकूण बरे झालेले : 82,231 भारतातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा : 13,871,321 भारतातील कोरोना झालेल्या मृत्यूंचा आकडा : 1,72,115 भारतात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या : 12,332,688
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. देशातील सर्वात जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रातच आढळत आहे. आता कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवस संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत पूर्ण राज्यात कलम 144 लागू असेल. यादरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच घराबाहेर पडता येईल.
Corona Updates In India Latest News
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App