देशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त

Corona Updates In India

Corona Tsunami in India : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. ही लाट नसून त्सुनामीच असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ आणि मृतांची वाढणारी संख्या यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सोमवारी देशातील कोरोना संसर्गाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2.74 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 1619 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त बाधित राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. Corona Tsunami in India, 2.74 lakh patients in 24 hours, 1619 deaths


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केले आहे. ही लाट नसून त्सुनामीच असल्याचे ताज्या आकडेवारीतून समोर आले आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्येत भरमसाट वाढ आणि मृतांची वाढणारी संख्या यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सोमवारी देशातील कोरोना संसर्गाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2.74 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 1619 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. कोरोनामुळे सर्वात जास्त बाधित राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात सर्वात जास्त 2,73,810 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून देशात संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 1,50,61,919 झाली आहे. याचवेळी 24 तासांमध्ये कोरोनामुळे 1,619 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या 1,78,769 वर गेली आहे. आतापर्यंतचीही सर्वात जास्त आकडेवारी आहे.

अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 1,44,178 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत देशातील 1,29,53,821 रुग्णांनी कोरोना यशस्वी मात केली आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निम्मी आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 19,29,329 पर्यंत वाढली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक सक्रिय रुग्ण भारतात आहेत.

Corona Tsunami in India, 2.74 lakh patients in 24 hours, 1619 deaths

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात