रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गरीबीचा सामना करणारे आणि रिक्षा चालवून पोट भरण्याची वेळ माजी नॅशनल बॉक्सर आबिद खान यांच्यावर आली आहे. त्यांना मदत करण्यासाठी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी पुढाकार घेतला आहे. Boxer who fills his stomach by driving a rickshaw Anand Mahindra’s initiative to help

आबिद हे एनआयएसमधून क्वालिफाइड कोचदेखील आहेत. मात्र, त्यांना कुठेही नोकरी न मिळाल्याने ते रिक्षा चालवून कुटुंब चालवित आहेत.

खेलगावचे सौरभ दुग्गल यांनी आबिद यांच्यावरचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यावर आनंद महिंद्रांनी हे रिट्विट करीत लिहिलं आहे की, धन्यवाद सौरभ. मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे की, कठीण परिस्थिती असतानाही ते कोणत्याही मदतीची अपेक्षा करीत नाहीत. त्यामुळे मी लोकांना मदतीचं आवाहन करण्यापेक्षा त्यांची प्रतिभा आणि व्यासंग खूप मोलाचा आहे. मी त्यांचं स्टार्टअप बॉक्सिंग अकॅडमीमध्ये गुंतवणूक करू शकतो का आणि या माध्यमातून त्यांना मदत करू शकतो का, याबाबत मला सांगा.

गरीबी मोठा शाप : आबिद खान

व्हिडिओमध्ये आबिद खान म्हणतात की, गरीब किंवा मिडल क्लास व्यक्तीसाठी गरीबी हा सर्वात मोठा शाप आहे. आणि त्यापेक्षाही तो क्रीडा प्रेमी असेल तर परिस्थिती अधिक बिकट होते. यामध्ये वेळेच्या अपव्ययाशिवाय दुसरं काही नाही. स्पोर्ट्समॅन असताना मी खूप यश मिळवलं. डिप्लोमा केला. मात्र त्यानंतर मला नोकरी मिळाली नाही. सर्वत्र नकारचं मिळत होता. बॉक्सिंगमध्ये मिडल क्लास किंवा गरीब लोक येतात. कारण यात खूप धक्के खावे लागतात. पैसे वाले तर क्रिकेट, लॉन टेनिस, बँडमिंटन खेळतात.

Boxer who fills his stomach by driving a rickshaw Anand Mahindra’s initiative to help


महत्वाच्या बातम्या वाचा

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात