कोरोना संक्रमणात झपाट्याने घट, दुसरी लाट लवकर संपण्याचा आरोग्यमंत्र्यांना विश्वास


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – देशातील कोरोना संक्रमणात झपाट्याने घट होते आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केला आहे. मागील २४ तासात देशात २,०८,९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि ४,१५७ कोरोनाग्रस्तांनी जीव गमावला. Corona second wave will finish soon

हर्षवर्धन यांनी ट्विट करून सांगितले, की देशात संक्रमण दर सतत कमी होत आहे. रुग्ण संख्येतील घसरण यापुढे अशीच चालु राहील आणि हळूहळू कोरोनाची दुसरी लाट संपून जाईल, असा विश्वास वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती देशासाठी चांगला संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील २,९५,९५५ कोरोना रुग्णांनी या काळात महासाथीला हरविले आहे. दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ३ लाख ११ हजार ३८८ वर पोहोचली असून, लसीकरण झालेल्यांची संख्या २०,०६,६२४५ झाली, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Corona second wave will finish soon

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी