विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामुळे अनलॉक केले जात आहे. देशात मंगळवारी ४२ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तीन महिन्यातील ही नीचांकी आकडेवारी आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केले जात आहेत.Corona pataiant decresed
दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला विषाणूचा डेल्टा व्हॅरियंट नष्ट झालेला नाही. त्यात बदल होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. लॅम्बडा नावाचा विषाणूचा नवा प्रकार परदेशात सापडला आहे.
विषाणूतील बदल हा देखील तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बाजारांतील गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरेल, असे मत मांडले आहे.
सध्या दैनंदिन संसर्गाचा दर २.३६, तर साप्ताहिक दर ३.२१ आहे. परंतु महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळमधील काही जिल्ह्यांत हा दर कमी झालेला नाही. त्यामुळे तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत.त्यातही निर्बंध शिथिल केल्याने बाजारापेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे.कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नसल्याने अशी गर्दी वाढत राहिल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App