कोरोनावर औषधाचा दावा आणि हजारोंची रांग, आंध्र प्रदेश सरकारने तपासणीसाठी पाठविले पथक


आंध्र प्रदेशातील एका वैद्याने कोरोनावर आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा करत विक्रीही सुरू केली. त्यामुळे अक्षरश: हजारो जणांची रांग औषध घेण्यासाठी लागली होती. त्यामुळे औषधाची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने पथक पाठविले आहे.Corona drug claim and queue of thousands, Andhra Pradesh government sent a team to investigate


विशेष प्रतिनिधी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील एका वैद्याने कोरोनावर आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा करत विक्रीही सुरू केली. त्यामुळे अक्षरश: हजारो जणांची रांग औषध घेण्यासाठी लागली होती. त्यामुळे औषधाची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने पथक पाठविले आहे.

कोरोनामुळे नागरिक प्रचंड धास्तावले आहेत. त्यामुळे त्यावर औषध आले म्हटल्यावर प्रचंड गर्दी झाली होती. नेल्लोर येथील गदीर्बोगिनी आनंदय्या गेल्या काही वर्षांपासून औषधी वनस्पतींसह आयुर्वेदिक औषधे बनवतात.



आले, खजूर गुळ, मध, काळी जिरे, मीरे, तेज पत्ता, लवंग,कडुलिंबाची पाने, अब्यांच्या रोपट्याची पाने,आवळा, यसिंथ पाने,खोकली पाने,रुईचे झाड, फुलांच्या कळ्या,काटेरी वांगे आदींचा वापर करून आपण कोरोनावरील औषध बनविल्याचा दावा त्यांनी केला होता.

त्यामुळे हे औषध विकत घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. सुमारे 3 किमीपर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. शेजारील राज्यांतूनही येथे मोठ्या प्रमाणावर लोक येऊ लागले. हे औषध कोरोनापासून मुक्त करते, असा दावा आनंदय्या यांनी केला आहे.

त्यांचा हा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या आयुर्वेदिक औषधाचा प्रभाव खरच पडतोय का, याची सत्यता तपासण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी आयसीएमआर सदस्यांची विशेष टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत यावर चर्चा केली.आयसीएमआर या औषधाची तपासणी करणार आहे. औषधांची तपासणी झाल्यानंतर औषध वाटप करण्याचा निर्णय सरकार घेईल, असे त्यांनी सांगितले. आयुर्वेदिक औषधाचे वितरण थांबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.

Corona drug claim and queue of thousands, Andhra Pradesh government sent a team to investigate

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात