विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : कोरोनाच्या संसर्गाने पीडित रुग्णांना आयुर्वेदिक औषध देणाऱ्या वैद्य आनंदय्या यांच्या के नावाच्या आणखी एका औषधाच्या वितरणाला आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. हे औषध रुग्णांच्या डोळ्यांत टाकले जाते. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. Coron Eye drop get green signal
या औषधासाठी आयुष मंत्रालयाकडून आवश्यक अहवाल न मिळाल्याने त्याच्या वितरणाला राज्य सरकारने त्याच्या परवानगी दिली नव्हती. यासंबंधी त्यांनी उच्च न्यायालयात तक्रार केली होती. यावर न्यायाधीशांनी तत्काळ परवानगी दिली. डोळ्यात टाकणाऱ्या या औषधासंबंधी दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
तसेच या औषधाच्या वितरणावरून न्यायाधीशांनी आनंदय्या यांनाही काही सूचना केल्या. या प्रकरणी पुढील सुनावणी २१ जूनपर्यंत स्थगित केली आहे. आनंदय्या यांचे औषध डोळ्यात टाकून घेण्यासाठी हैदराबादमध्य प्रचंड रांगा लागल्याचे चित्र गेल्या महिन्यात पहायला मिळाले हते. लोकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. त्यांच्या औषधावर काही जणांनी आक्षेफ घेतला होता. तर काही जण थेट न्यायालयातच गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App