CONTROVERSY: २०१४ पासून भारत अमेरिकेचा गुलाम! काँग्रेस नेते मणिशंकर यांचे वादग्रस्त विधान


अभिनेत्री कंगना राणौतने केलेले विधान वादग्रस्त असेल तर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेले वक्तव्य देखील तसेच आहे. CONTROVERSY: India has been a slave of America since 2014! Controversial statement of Congress leader Mani Shankar


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  कंगना राणौतने केलेले विधान वादग्रस्त असल्याचे सांगत काँग्रेसने बराच गदारोळ केला .मात्र आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावर कॉंग्रेसची भुमिका काय असेल हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. इंडो-रशिया फ्रेंडशिप सोसायटीच्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्यर म्हणाले की, 2014 पासून आपण अमेरिकेचे गुलाम झालो आहोत. अय्यर यांनी आपल्या भाषणात भारत-रशिया संबंधांचा उल्लेख केला .

भारत अमेरिकेचा गुलाम

माजी केंद्रीय मंत्री अय्यर पुढे म्हणाले की, ‘अमेरिकेसोबत तणाव होता, पण मॉस्कोसोबतचे आमचे संबंध कधीही इतके तणावपूर्ण नव्हते. भाजपचे सरकार आल्यापासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. गेल्या 7 वर्षात आपण पाहत आहोत की, गुटनिहाय चर्चा होत नाही, शांततेची चर्चा होत नाही. आपण आज अमेरिकन गुलाम बनून बसलो आहोत. भारत आणि रशियाचे संबंध जुने आहेत, मात्र मोदी सरकार आल्यापासून हे नाते कमकुवत झाले आहे. 2014 पासून आपले रशियाशी असलेले संबंध खूपच कमी झाले आहेत.’स्वातंत्र्याच्या 8 वर्षानंतर म्हणजे 1955 पासून भारत-रशिया यांच्यातील संबंधांमध्ये सातत्याने प्रगती होत असली तरी गेली 7 वर्षे आपण अमेरिकेचे गुलाम बनून बसल्याचे पाहायला मिळत आहे.

CONTROVERSY : India has been a slave of America since 2014! Controversial statement of Congress leader Mani Shankar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”