अबब…चुकीच्या रीतीने केस कापल्याने तब्बल दोन कोटींचा दंड


 

नवी दिल्ली – एका महिलेचे लांब केस कापणे आणि चुकीचे उपचार केल्याप्रकरणी दिल्लीच्या ग्राहक मंचाने एका नामांकित हॉटेलला दोन कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश दिले. आशना रॉय असे महिलेचे नाव असून संबंधित हॉटेलमधील सलूनमध्ये तिचे लांब केस कापले आणि चुकीच्या रीतीने केसांवर उपचार करण्यात आले.Consumer court fined two crore to five star hotel

त्यामुळे तिचे मोठे नुकसान झाले आणि जीवनशैली बिघडली. टॉप मॉडेल होण्याचे तिचे स्वप्न भंगले.याप्रकरणी तिने २०१८ रोजी ग्राहक मंचात दावा ठोकला. ग्राहक मंचाच्या एका पीठाचे अध्यक्ष आर.के. अग्रवाल आणि सदस्य एस.एम.कांतिकर यांनी निकाल देत याचिकाकर्त्या महिलेला दोन कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले.निकालात म्हटले की, महिला आपल्या केसाविषयी खूपच संवेदनशील असतात. केसांची निगा राखण्यासाठी त्या खूप पैसा खर्च करत असतात आणि एकप्रकारे त्यांचे केसांशी भावनिक नाते असते. रॉय या आपल्या लांब केसामुळे हेअर प्रॉडक्टसाठी मॉडेलिंग करत. याशिवाय अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत असत.

परंतु हॉटेलमधील सलूनने तिने दिलेल्या सूचनांच्या विरुद्ध केशरचना केली. तिचे केस कापले. त्यामुळे तिच्या हातातून मोठे प्रकल्प निसटले आणि नुकसान सहन करावे लागले. तिला मानसिक धक्का बसला आणि नोकरी देखील गेली.

अर्थात महिलेने हॉटेल व्यवस्थापनाशी केलेल्या व्हॉटसअप चॅटिंगवरून हॉटेलने चूक मान्य केल्याचे निष्पन्न होते. तसेच मोफत उपचार करण्याचे आमिष दाखवून हॉटेलने चूक लपविण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिलेस दोन महिन्यांत भरपाई द्यावी, असा आदेश दिला.

Consumer court fined two crore to five star hotel

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती