नुपूर शर्मांच्या हत्येचा कट; उत्तर प्रदेशात दहशतवादी अटकेत; पाकिस्तानी कनेक्शन उघड!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस एटीएसने (ATS) सहारनपूरमधून जैश ए मोहम्मद आणि तहरीक ए तालिबानशी संबंधित दहशतवाद्याला अटक करून मोठा कट उधळून लावला आहे. एटीएसने त्याची ओळख मोहम्मद नदीम अशी पटवली असून एटीएसच्या चौकशीत त्याने नुपूर शर्मांच्या हत्येचा कट उघड केला आहे. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी त्याला ही सुपारी दिली होती. एटीएसने एक प्रेस नोट जारी करून याबाबत माहिती दिली आहे. एजन्सीला माहिती मिळाली होती की सहारनपूरमधील गंगोह पोलीस स्टेशनच्या कुंडकलान गावात एक व्यक्ती फिदाईन हल्ल्याच्या तयारीत आहे, हा जैश आणि तहरीक ए तालिबानच्या प्रभावाखाली आहे. या धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा देशात खळबळ माजली आहे. या कारवाईने मोठा अनर्थ हा टळला आहे. Conspiracy to kill Nupur Sharma; Terrorists arrested in Uttar Pradesh

 पाकिस्तानात प्रशिक्षण

टीटीपीचा दहशतवादी सैफुल्ला याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद नदीमला फिदाईन हल्ल्याच्या तयारीसाठी प्रशिक्षण आणि साहित्य पुरवले होते. याच्या मदतीने सर्व सामान गोळा करून कोणत्याही सरकारी इमारतीवर किंवा पोलिसांवर हल्ला करण्याचा नदीमचा कट होता.

 दहशतवादी संघटनांचे चॅट सापडले

या दहशतवाद्याच्या फोनची तपासणी केली असता त्यात एक्सप्लोसिव्ह कोर्स फिदाई फोर्स असे एक डॉक्यूमेंट सापडले. मोहम्मद नदीमच्या फोनवरून जैश-ए-मोहम्मद आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या टीटीपी दहशतवाद्यांचे चॅट आणि ऑडिओ मसेजही मिळाले आहेत.

 दहशतवाद्यांच्या संपर्कात

मोहम्मद नदीमने चौकशीदरम्यान सांगितले की तो 2018 पासून जैश-ए-मुहम्मद आणि तहरीक-ए-तालिबान-ए-पाकिस्तानच्या संपर्कात आहे, जसे की व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, आयएमओ, फेसबुक मेसेंजर, क्लबहाऊस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तो वेळोवेळी त्यांच्याशी बातचीत करत असत. त्याने या दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल नंबर बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. दहशतवादी संघटनांनी त्याला व्हर्च्युअल सोशल मीडिया आयडी बनवून 30 हून अधिक व्हर्च्युअल नंबर दिले होते.

 पाकिस्तानलाही जाण्याचा आखला प्लॅन

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या जैश आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी हे दहशतवादी नदीमला पाकिस्तानात बोलावत होते. तो लवकरच व्हिसा घेऊन पाकिस्तानला जाणार होता. यानंतर तो इजिप्तमार्गे सीरिया आणि अफगाणिस्तानात जाण्याचा विचार करत होता. भारतातील दहशतवाद्याच्या संपर्कात आणखी काही लोक असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. सध्या त्यांच्या अटकेसाठी एटीएसनेही कारवाई सुरू केली आहे. या दहशतवाद्यांच्याही पोलीस लवकरच मुसक्या आवळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Conspiracy to kill Nupur Sharma; Terrorists arrested in Uttar Pradesh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात