वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावल्यानंतर आता देशातील सुरक्षा यंत्रणांना मोठा अलर्ट जारी केला आहे. यासिन मलिकला झालेल्या शिक्षेविरोधात आता काही दहशतवादी संघटना विविध ठिकाणांवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे. देशाच्या गुप्तचर विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत हे हल्ले घडण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. Conspiracy to carry out terrorist attacks in several cities, including Delhi, after Yasin Malik’s execution
अलर्ट जारी
दिल्लीतील तिहार जेलच्या जेल नं.7च्या वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये हल्ले घडवून आणले जाऊ शकतात, असा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या व्यतिरिक्त सुमारे 6 ते 7 संवेदनशील अलर्ट दिल्ली पोलिसांना प्राप्त झाले आहेत.
सीमेपलिकडून कारवाई होण्याची शक्यता
ज्यादिवशी मलिकला एनआयए न्यायालयाने दोषी ठरवले त्याच दिवसापासून दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासिन मलिकला झालेल्या शिक्षेचा सूड उगवण्यासाठी त्याच्या समर्थकांकडून राजधानी दिल्लीला निशाणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमेपलिकडून या दहशतवादी कारवाईचा कट रचण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यासिन मलिकच्या कारवाया
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App