कोरोनासाठी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनासंदर्भातील आरोग्य विम्याच्या प्रकरणावर एक तासाच्या आत योग्य कारवाई करून प्रक्रिया पूर्ण करावी. त्यामुळे रुग्णांना तातडीने डिस्चार्ज मिळणे शक्य होईल, असे आदेश भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) विमा काढणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.Consolation to the patients undergoing treatment, insurance claims regarding Corona will now be settled within an hour
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनासाठी रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनासंदर्भातील आरोग्य विम्याच्या प्रकरणावर एक तासाच्या आत योग्य कारवाई करून प्रक्रिया पूर्ण करावी.
त्यामुळे रुग्णांना तातडीने डिस्चार्ज मिळणे शक्य होईल, असे आदेश भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) विमा काढणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच आयआरडीएआयच्या अध्यक्षांना याबाबत कळविले होते. दिल्ली उच्च न्यायालयानेहर २८ एप्रिल रोजी आयआरडीएआयला आरोग्य कंपन्यांना तातडीने करोनासंदभार्तील क्लेमची प्रक्रिया वेगवान करण्याचे आदेश देण्याची सूचना केलेली.
विमा कंपन्या कोरोनासंदभार्तील अर्जांना मंजुरी देण्यासाठी सहा ते सात तास घालवू शकत नाहीत. असं केल्यास रुग्णांना रुग्णालयांमधून डिस्चार्ज मिळण्यास वेळ लागतो. त्यामुळे गरजुंना बेड्सची आवश्यकता असतानाही तो मिळत नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं.
आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना करोनासंदभार्तील विम्यांच्या प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्व पक्षकारांना करोना प्रकरणांची वेगाने पडताळणी करुन विम्याची रक्कम मंजूर करण्यासंदभार्तील निर्देश द्यावेत.
सर्व कागदपत्र आल्यानंतर एका तासामध्ये विम्याचं प्रकरण निकाली काढावं, असं करोनासंदभार्तील नव्या निदेर्शांमध्ये आयआरडीएने म्हटलं आहे.
विम्याची प्रकरणं अडकून राहिल्याने रुग्णालयांमधून रुग्णांना डिस्चार्ज मिळत नाही त्यामुळे गरजूंना सेवा उपलब्ध होत नाहीत आणि विम्यासाठी अर्ज करणारा रुग्णही अडकून राहतो.
विमा कंपन्यांना आणि टीपीए बिलांची रक्कम देण्यामध्ये जास्त वेळ लागत आहे. त्यामुळेच रुग्णालय प्रशासनालाही नाइलाजास्तव रुग्णांना ८ ते १० तास रुग्णालयातच ठेवावं लागत आहे. त्यामुळे बेड्स अडकडून राहत आहेत.
आयआरडीएआयच्या निदेर्शानंतर विमा प्रक्रिया वेगवान होऊन रुग्णांना तातडीने डिस्चार्ज मिळणार आहे. यापूर्वी आयआरडीएआयने दोन तासांमध्ये कॅशलेस क्लेमची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App